Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

पंतप्रधानांनी कौशल्य, कठोर परिश्रम, शिक्षण आणि मृदुभाषित्व या गुणांचे महत्त्व अधोरेखित करणारे संस्कृत सुभाषित केले सामायिक


पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी, कौशल्य, कठोर परिश्रम आणि करुणा या आपल्या जीवनातील अद्भुत शक्ती आहेत हे नमूद करणारे एक सुभाषित सामायिक केले. या गुणांच्या आधारे, आपण जीवनातील प्रत्येक आव्हानावर केवळ मातच करू शकत नाही, तर, आपली ध्येय साध्य करण्यासाठी देखील हे गुण उपयुक्त ठरतात असे त्यांनी अधोरेखित केले.

पंतप्रधान पुढे म्हणाले, कुशल व्यक्तींसाठी कोणतेही कार्य कठीण नसते; कठोर परिश्रम करणाऱ्यांसाठी कोणतेही ध्येय असाध्य नसते; सुशिक्षित व्यक्तींसाठी स्वदेश आणि परदेश यांच्यात कोणताही फरक नसतो; आणि ज्याचे बोलणे दयाळूपणाचे, प्रेमळ असते, त्या व्यक्तीसाठी कोणीही परके नसते.

‘एक्स’वरील आपल्या संदेशांत पंतप्रधान म्हणाले :

“कौशल्य, कठोर परिश्रम आणि करुणा या आपल्या जीवनातील अद्भुत शक्ती आहेत. त्यांच्याद्वारे आपण केवळ प्रत्येक आव्हानावर मात करू शकत नाही, तर त्या आपल्याला आपली ध्येये साध्य करण्यासही मदत करतात.

को हि भारः समर्थानां किं दूरं व्यवसायिनाम्।
को विदेशः सुविद्यानां कः परः प्रियवादिनाम्॥”

कुशल लोकांसाठी कोणतेही कार्य कठीण नसते; कष्टाळू लोकांसाठी कोणतेही ध्येय दूर नसते; सुशिक्षित लोकांसाठी स्वदेश आणि परदेश यात काहीच फरक नसतो; आणि मृदुभाषी लोकांसाठी कोणीही परके नसते.

***

NitinFulluke / SavitaMhaskar / DineshYadav

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:PM India@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai   PM India /pibmumbai  PM Indiapibmumbai[at]gmail[dot]com  PM India/PIBMumbai   PM India /pibmumbai