पीएम्इंडिया
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज क्लब दा शेफ दा शेफ अर्थात जगभरातील राष्ट्राध्यक्षांच्या शेफच्या क्लबच्या सदस्यांची भेट घेतली.
या क्लबमध्ये 24 देशांच्या राष्ट्राध्यक्षांच्या खाजगी बल्लवांचा अर्थात शेफचा समावेश आहे. हा क्लब सात्विक आहार शास्त्रासंबंधी जगातील सर्वात महत्त्वाची समिती मानला जातो.
पॅरिस येथील या संघटनेचे महाअधिवेशन पहिल्यांदाच भारतात होत आहे. हे बल्लव दिल्लीसह आग्रा आणि जयपूरला भेट देणार आहे.
क्लबच्या सदस्यांमध्ये भारताच्या राष्ट्रपतींचे शेफ मॉन्टो सैनी, अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षाच्या शेफ क्रिस्टीया कॉमरफोर्ड, युनायटेड किंगडमच्या राणीचे शेफ मार्क फ्लॅनॅगन यांचा समावेश आहे.
यावेळी या शेफनी पंतप्रधानांबरोबर सामूहिक छायाचित्र काढतानाच त्यांना स्मृतिचिन्ह प्रदान केले.
B.Gokhale/M.Pange/Anagha
Met some of the most decorated Chefs, serving heads of states of various nations, during an interaction with Club des Chefs des Chefs (CCC). pic.twitter.com/PH6dxCgAwu
— Narendra Modi (@narendramodi) October 25, 2016