Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

पंतप्रधानांनी गुजरातच्या वडोदरा येथे ‘सरदारधाम’ वसतिगृहाच्या उद्घाटनप्रसंगी केलेल्या भाषणातील काही क्षणचित्रे सामायिक केली

पंतप्रधानांनी गुजरातच्या वडोदरा येथे ‘सरदारधाम’ वसतिगृहाच्या उद्घाटनप्रसंगी केलेल्या भाषणातील काही क्षणचित्रे सामायिक केली


नवी दिल्ली, 11 मे 2026

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज वडोदरा येथील ‘सरदारधाम वसतिगृहा’च्या उद्घाटनप्रसंगी केलेल्या भाषणातील काही क्षणचित्रे सामायिक केली; यामध्ये त्यांनी देशाच्या सर्वांगीण प्रगतीला गती देण्यासाठी सरकार, समाज आणि 140 कोटी नागरिकांच्या सामूहिक प्रयत्नांमध्ये असलेल्या शक्तीवर प्रकाश टाकला.

एक्स वर केलेल्या पोस्टच्या मालिकेमध्ये पंतप्रधान लिहितात,

“वडोदरा येथील सरदारधाम वसतिगृहाचे उद्घाटन करताना मला प्रचंड समाधान आणि अभिमान वाटतो.”

“मोठ्या बदलांसाठी आणि उत्तम परिणामांसाठी, समाज आणि सरकारने एकत्र काम करणे अत्यंत महत्त्वाचे आहे. राष्ट्रीय शिक्षण धोरण हे याचे उत्तम उदाहरण आहे.”

“आपल्या मुला-मुलींसाठी सर्व क्षेत्रांमध्ये संधीची नवी दारे उघडणे ही सरकार आणि समाज या दोघांचीही जबाबदारी आहे. मला आनंद आहे की सरदारधाम ही जबाबदारी पूर्ण समर्पणाने पार पाडत आहे.”

“गुजरात आणि संपूर्ण देशाला जागतिक पुरवठा साखळीचे एक प्रमुख केंद्र बनवण्यासाठी आम्ही सातत्याने प्रयत्न करत आहोत. भविष्यात वडोदरादेखील यात महत्त्वाची भूमिका बजावेल.”

“जेव्हा 140 कोटी लोक एक पाऊल पुढे टाकतात, तेव्हा देशही 140 कोटी पावले पुढे टाकतो. त्यामुळे, या जागतिक संकटाच्या काळात, माझ्या देशवासियांसाठी माझे हे विशेष आवाहन….”

नेहा कुलकर्णी/वैभवी जोशी/प्रिती मालंडकर

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:PM India@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai   PM India /pibmumbai  PM Indiapibmumbai[at]gmail[dot]com  PM India/PIBMumbai   PM India /pibmumbai