Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

पंतप्रधानांनी चंडिगढ येथे भारत-फ्रान्स व्यापार शिखर परिषदेला संबोधित केले 16 करारांवर स्वाक्षऱ्या

पंतप्रधानांनी चंडिगढ येथे भारत-फ्रान्स व्यापार शिखर परिषदेला संबोधित केले
16 करारांवर स्वाक्षऱ्या

पंतप्रधानांनी चंडिगढ येथे भारत-फ्रान्स व्यापार शिखर परिषदेला संबोधित केले
16 करारांवर स्वाक्षऱ्या

पंतप्रधानांनी चंडिगढ येथे भारत-फ्रान्स व्यापार शिखर परिषदेला संबोधित केले
16 करारांवर स्वाक्षऱ्या


पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज चंडिगढ येथे भारत-फ्रान्स व्यापार शिखर परिषदेला संबोधित केले.

सीओपी – 21 वाटाघाटींमध्ये फ्रान्सने ज्याप्रकारे समन्वय साधला त्याची पंतप्रधानांनी प्रशंसा केली. राष्ट्रपती ओलांद यांनी आपल्याशी दूरध्वनीवरुन संवाद साधला आणि नियोजित कराराची घोषणा करण्यापूर्वी त्याचा आराखडा आपल्याला सांगितल्याची आठवण पंतप्रधानांनी करुन दिली.

सीओपी – 21 बैठकीपूर्वी पॅरिसमध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्याची आठवण पंतप्रधानांनी सांगितली आणि आपल्या प्रमुख तत्त्वांपासून विचलित न होता दहशतवादाचा सामना कसा करायचा हे फ्रान्सने दाखवून दिले, असे ते म्हणाले. दहशतवादाविरुद्धच्या लढ्यात भारत-फ्रान्सच्या खांद्याला खांदा लावून उभा राहील, असे ते म्हणाले.

उभय देशांमधील पूरक वैशिष्ट्यांबाबत विस्ताराने बोलताना पंतप्रधान म्हणाले की खरे, तर दोन्ही देश एकमेकांसाठी बनले आहेत. सुरक्षा आणि संरक्षण क्षेत्राबाबत पंतप्रधान म्हणाले की, भारताची बुद्धिमत्ता आणि फ्रान्सची उत्पादन क्षमता एकत्रितपणे जगाला अधिक सुरक्षित बनवतील. यासंदर्भात त्यांनी सायबर सुरक्षेचाही उल्लेख केला.

फ्रेंच कंपन्यांनी भारतात चांगली गुंतवणूक केल्याचे पंतप्रधान म्हणाले. पूर्वलक्ष्मी प्रभावाने लादण्यात येणारा कर आता भूतकाळात जमा झाल्याचे ते म्हणाले. “मिशन इनोव्हेशन”च्या उपक्रमांचा त्यांनी उल्लेख केला.

या परिषदेत 16 सामंजस्य करारांवर स्वाक्षऱ्या करण्यात आल्या.

S. Kane/ S. Tupe/ M. Desai