Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

पंतप्रधानांनी चीन, कोरिया, मंगोलिया आणि व्हिएतनामच्या जनतेला नवीन चंद्र वर्षाच्या शुभेच्छा दिल्या


पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी चीन, कोरिया, मंगोलिया आणि व्हिएतनामच्या जनतेला नवीन चंद्रवर्षाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

“जगभरातील चीनी मित्रांना नववर्षाच्या शुभेच्छा. हे वानरवर्ष तुमच्या जीवनात आनंद आणि समृध्दी घेऊन येवो.

प्रिय कोरियन मित्रांनो, तुम्हा सर्वांना सेओलालच्या शुभेच्छा. हे वर्ष तुम्हाला चांगले जावो.

मंगोलियाच्या लोकांना सागन सारच्या शुभेच्छा. हे वर्ष तुम्हाला आनंदाचे, निरोगी आरोग्याचे आणि समृध्दीचे जावो.

व्हिएतनामच्या जनतेला टेटच्या शुभेच्छा. हे वर्ष आनंदाचे आणि समृध्दीचे जावो”. असे पंतप्रधानांनी ट्विटरवर म्हटले आहे.

S.Kane/ S.Tupe/ M.Desai