Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

पंतप्रधानांनी ‘जीवनमानातील सुलभता’ तसेच ‘व्यवसाय करण्यातील सुलभता’ यांना चालना देण्याच्या हेतूने आयोजित मंत्रीमंडळ बैठकीचे अध्यक्षपद भूषवले


नवी दिल्‍ली, 22 मे 2026

 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल झालेल्या मंत्रिमंडळाच्या फलदायी बैठकीचे तपशील आज सामायिक केले.

पंतप्रधान म्हणाले की मंत्रिमंडळातील सदस्यांनी ‘जीवनमानातील सुलभता’ तसेच ‘व्यवसाय करण्यातील सुलभता’ यांना चालना देण्यासाठी उपयुक्त दृष्टीकोन तसेच सर्वोत्तम पद्धती यांच्या संदर्भात विचारविनिमय केला. विकसित भारताचे स्वप्न साकार करण्यासाठी आवश्यक सुधारणा अधिक प्रभावीपणे कशा पुढे नेता येतील, यावरही सविस्तर विचारमंथन झाल्याचे मोदी यांनी अधोरेखित केले.

एक्स मंचावर लिहिलेल्या संदेशात पंतप्रधान म्हणतात:

“काल झालेली मंत्रिमंडळाची बैठक फलदायी ठरली. ‘जीवनमानातील सुलभता’ तसेच ‘व्यवसाय करण्यातील सुलभता’ यांना चालना देण्याशी संबंधित उपयुक्त दृष्टीकोन तसेच सर्वोत्तम पद्धती यांच्या संदर्भात तसेच विकसित भारताचे सामायिक स्वप्न वास्तवात यशस्वीपणे साकार करण्याच्या दृष्टीने विविध सुधारणांना कशा प्रकारे परिणामकारकरीत्या पुढे नेता येईल याबाबत आम्ही विचारविनिमय केला.

 

* * *

नेहा कुलकर्णी/संजना चिटणीस/दर्शना राणे

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:PM India

@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai   PM India /pibmumbai  PM Indiapibmumbai@gmail.com  PM India/PIBMumbai   PM India /pibmumbai