Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

पंतप्रधानांनी डॉ.आर बालसुब्रमण्यम यांच्या ‘पॉवर विदिन: द लीडरशिप लिगसी ऑफ नरेंद्र मोदी’ या पुस्तकाच्या प्रतीवर केली स्वाक्षरी


नवी दिल्‍ली, 17 जुलै 2024

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची आज डॉ. आर बालसुब्रमण्यम यांनी भेट घेतली आणि त्यांच्या ‘पॉवर विदिन: द लीडरशिप लिगसी ऑफ नरेंद्र मोदी’ या पुस्तकाच्या प्रतीवर स्वाक्षरी केली. या पुस्तकात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाच्या प्रवासाचे वर्णन केले असून पाश्चात्य आणि भारतीय दृष्टीकोनातून त्याचा अर्थ सांगितला आहे. तसेच या दोन्हींचा समावेश करून सार्वजनिक सेवेसाठी जीवन समर्पित करण्याची आकांक्षा बाळगणाऱ्यांसाठी या पुस्तकात एक मार्गदर्शक आराखडा प्रदान केला आहे.

डॉ आर बालसुब्रमण्यम यांच्या X वरील पोस्टला उत्तर देताना पंतप्रधानांनी लिहिले:

“आज डॉ आर बालसुब्रमण्यम यांना भेटून खूप आनंद झाला. त्यांच्या पुस्तकाच्या एका प्रतीवर स्वाक्षरीही केली. त्यांच्या  पुढील वाटचालीसाठी माझ्या शुभेच्छा.”

* * *

S.Kane/S.Mukhedkar/D.Rane

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:PM India@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai   PM India /pibmumbai  PM Indiapibmumbai@gmail.com [ PM India 0KB ]   PM India/PIBMumbai   PM India /pibmumbai