Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

पंतप्रधानांनी डॉ. बी.आर. आंबेडकर यांच्या स्मृतीप्रित्यर्थ नाणी प्रकाशित केली

डॉ. बी. आर. आंबेडकर यांच्या 125 व्या जयंती वर्ष समारंभाचा एक भाग म्हणून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज त्यांच्या स्मृतीप्रित्यर्थ दोन नाणी प्रकाशित केली. बाबासाहेब आंबेडकरांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त दहा रुपये आणि 125 रुपये मूल्याची नाणी प्रकाशित करण्यात आली.

यावेळी पंतप्रधान म्हणाले की काही निवडक व्यक्तीच आहेत, ज्या त्यांच्या मृत्यूला साठ वर्षं लोटली तरीही लोकांच्या मनात जिवंत राहतात. ते म्हणाले की, भारतात सध्या चर्चेत असलेल्या मुद्दयांसंदर्भात डॉ. आंबेडकरांच्या विचारांचे जितके आपण स्मरण करतो, तेवढाच त्यांची दूरदृष्टी आणि सर्वसमावेशकतेबाबतचा त्यांचा दृष्टिकोण याबाबतचा आदर आणखी वाढतो.

पंतप्रधान म्हणाले की सामाजिक न्यायाप्रति त्यांनी दिलेल्या योगदानाला ओळख मिळाली आहे, मात्र त्यांचे आर्थिक विचार आणि दूरदृष्टी अद्याप पूर्णपणे समजून घेतली गेली नाही आणि त्यांची प्रशंसा व्हायला हवी. पंतप्रधान म्हणाले की, डॉ. आंबेडकर आणि भारतीय राज्यघटना याबाबत देशभरात चर्चा व्हायला हवी आणि 26 नोव्हेंबर हा दिवस “संविधान दिन” म्हणून पाळणे हे या दिशेने एक पाऊल आहे.

महिला सबलीकरण, भारताची संघरचना, वित्त शिक्षण यांसारख्या विषयांबाबत डॉ. आंबेडकरांच्या दृष्टिकोनाची पंतप्रधानांनी प्रशंसा केली.

यावेळी केंद्रीय मंत्री अरुण जेटली आणि थावर चंद गेहलोत उपस्थित होते.

S.Kane/S.Tupe/M.Desai