Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

पंतप्रधानांनी तेलंगणा राज्यातील जनतेला राज्य स्थापना दिनाबद्दल शुभेच्छा दिल्या


नवी दिल्‍ली, 2 जून 2026

 

तेलंगणा राज्याच्या स्थापना दिनानिमित्त आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राज्यातील जनतेला शुभेच्छा दिल्या.

तेलंगणामधील लोक त्यांच्या नवोन्मेषशाली आणि उद्योगी वृत्तीसाठी प्रसिद्ध आहेत हे नमूद करुन पंतप्रधानांनी या राज्याची वैभवशाली संस्कृती आणि धैर्य तसेच निश्चयी वृत्तीचा इतिहास अधोरेखित केला. ‘विकसित भारता’चे स्वप्न साकार करण्यासाठी तेलंगणा राज्याच्या विकासाच्या उभरत्या वाटचालीला पाठिंबा देण्यासाठी केंद्र सरकारच्या कटिबद्धतेची ग्वाही देत मोदी यांनी तेलंगणाच्या जनतेचे उत्तम आरोग्य आणि यशासाठी प्रार्थना केली.

एक्स मंचावर लिहिलेल्या संदेशात पंतप्रधान म्हणतात:

“तेलंगणा राज्यातील जनतेला राज्य स्थापना दिनाच्या विशेष प्रसंगानिमित्त शुभेच्छा. तेलंगणामधील लोक त्यांच्या नवोन्मेषशाली आणि उद्योगी वृत्तीसाठी प्रसिद्ध आहेत. हे राज्य वैभवशाली संस्कृती तसेच धैर्य आणि निश्चयी वृत्तीचा इतिहास यासाठी ओळखले जाते. आपल्या सर्वांचे ‘विकसित भारता’चे स्वप्न साकार करण्यासाठी तेलंगणा राज्याच्या विकासाच्या उभरत्या वाटचालीला पाठींबा देण्यासाठी केंद्र सरकार कटिबद्ध आहे. तेलंगणाच्या जनतेला उत्तम आरोग्य आणि सुयश चिंतितो.”

 

* * *

नेहा कुलकर्णी/संजना चिटणीस/दर्शना राणे

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:PM India

@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai   PM India /pibmumbai  PM Indiapibmumbai@gmail.com  PM India/PIBMumbai   PM India /pibmumbai