Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

पंतप्रधानांनी दिल्लीच्या ईशान्य भागातल्या दयालपूरमध्ये  इमारत कोसळून झालेल्या जीवितहानीबद्दल शोक व्यक्त केला


पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज ईशान्य दिल्लीतल्या दयालपूर भागात इमारत कोसळल्याने झालेल्या जीवितहानीबद्दल तीव्र दुःख व्यक्त केले आहे. मृत व्यक्तीच्या नातेवाईकाला पंतप्रधान राष्ट्रीय मदत निधी (पीएमएनआरएफ) कडून 2 लाख रुपयांचे  सहाय्य  आणि जखमींना 50,000 रुपये देण्यात येणार आहेत.

पंतप्रधान कार्यालयाने एक्स वरील एका पोस्टमध्ये सांगितले:

ईशान्य दिल्लीतल्या दयालपूर भागात इमारत कोसळून झालेल्या जीवितहानीमुळे अत्यंत दुःख झाले. ज्यांनी आपले प्रियजन गमावले आहेत त्यांच्या दुःखात  सहभागी आहे.जखमी लवकर बरे व्हावेत ही प्रार्थना. स्थानिक प्रशासन पीडितांना मदत करत आहे.

पीएमएनआरएफ कडून प्रत्येक मृताच्या नातेवाईकांना 2 लाख रुपये आणि जखमींना 50,000 रुपयांची मदत दिली  जाईल.”

***

N.Chitale/G.Deoda/P.Kor

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: PM India@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai   PM India /pibmumbai  PM Indiapibmumbai@gmail.com [ PM India 0KB ]