Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

पंतप्रधानांनी धैर्य आणि चिकाटीचे महत्त्व सांगणारे संस्कृत सुभाषित केले सामायिक


धैर्य, ही कुठल्याही राष्ट्राची सर्वात मोठी शक्ती आहे, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटले आहे. यामुळे कठीण आव्हानांमध्येही देशाला एकजूट राखण्याची आणि प्रगती, समृद्धी व आत्मनिर्भरतेच्या दिशेने निरंतर वाटचाल करण्याची प्रेरणा मिळते, असे त्यांनी म्हटले आहे. 

पंतप्रधानांनी संस्कृत सुभाषित सामायिक केले आहे – 

“चलन्ति गिरयः कामं युगान्तपवनाहताः।

कृच्छ्रेऽपि न चलत्येव धीराणां निश्चलं मनः।। ”

हे सुभाषित सांगते की, प्रलयकाळी प्रचंड वादळी वाऱ्यांच्या तडाख्याने पर्वतही हादरू लागतात, धैर्यवान व्यक्तीचे मन मात्र संकटाच्या काळातही अविचल आणि शांत राहते.

पंतप्रधानांनी एक्सवर लिहिले आहे; 

”धैर्य, ही कुठल्याही राष्ट्राची सर्वात मोठी शक्ती आहे. यामुळे कठीण आव्हानांमध्येही देशाला एकजूट राखण्याची आणि प्रगती, समृद्धी व आत्मनिर्भरतेच्या दिशेने निरंतर वाटचाल करण्याची प्रेरणा मिळते. 

चलन्ति गिरयः कामं युगान्तपवनाहताः।

कृच्छ्रेऽपि न चलत्येव धीराणां निश्चलं मनः।।”

***

NehaKulkarni / SonaliKakde / DineshYadav

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:PM India@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai   PM India /pibmumbai  PM Indiapibmumbai[at]gmail[dot]com  PM India/PIBMumbai   PM India /pibmumbai