Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

पंतप्रधानांनी नेपाळ सरकारचे आणि जनतेचे निवडणुकांच्या यशस्वी व शांततापूर्ण आयोजनाबद्दल अभिनंदन केले.


पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नेपाळची जनता व नेपाळ सरकारचे देशातील निवडणुकांच्या यशस्वी व शांततापूर्ण आयोजनाबद्दल अभिनंदन केले आहे.

नेपाळच्या जनतेने आपला लोकशाही हक्क मोठ्या उत्साहाने बजावल्याचे पाहून समाधान वाटल्याचे पंतप्रधानांनी नमूद केले. नेपाळमधील निवडणुकांचे यशस्वी आयोजन हा नेपाळच्या लोकशाही वाटचालीतील ऐतिहासिक टप्पा तसेच अभिमानाची बाब असल्याचे पंतप्रधानांनी म्हटले आहे.

भारत हा नेपाळचा जवळचा मित्र व शेजारी असून नेपाळची जनता व नवीन सरकारसोबत नेपाळला शांततेच्या, प्रगतीच्या व समृद्धीच्या नव्या उंचीवर नेण्यासाठी  मदत करण्यासाठी  वचनबद्ध असल्याचं प्रतिपादन पंतप्रधानांनी केले.  

पंतप्रधानांनी एक्स वरील आपल्या संदेशात लिहिले आहे,

“नेपाळमध्ये निवडणुकांचे यशस्वी व शांततापूर्ण आयोजन केल्याबद्दल मी  नेपाळची जनता आणि नेपाळ सरकारचे अभिनंदन करत आहे. नेपाळच्या बंधुभगिनींनी आपला लोकशाही हक्क मोठ्या उत्साहाने बजावल्याचे पाहून समाधान वाटले.

नेपाळच्या लोकशाही वाटचालीतील हा एक ऐतिहासिक टप्पा व अभिमानाची बाब आहे.

नेपाळचा जवळचा मित्र व शेजारी या नात्याने  नेपाळची जनता व नवीन सरकारसोबत काम करत नेपाळला शांततेच्या, प्रगतीच्या व समृद्धीच्या नव्या उंचीवर नेण्यासाठी भारत आपल्या वचनबद्धतेवर ठाम आहे.”  

***

सुषमा काणे/उमा रायकर/परशुराम कोर

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: PM India@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai   PM India /pibmumbai  PM Indiapibmumbai@gmail.com