पीएम्इंडिया
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ग्लासगो येथे आयोजित राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा 2026 मधील पुरुषांच्या 5000 मीटर शर्यतीत कांस्यपदक जिंकल्याबद्दल गुलवीर सिंह यांचे अभिनंदन केले आहे.
या उल्लेखनीय कामगिरीमुळे एका राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत अॅथलेटिक्समध्ये दोन पदके जिंकणारे गुलवीर सिंह हे पहिले भारतीय खेळाडू ठरले असल्याचे पंतप्रधानांनी म्हटले आहे. तसेच, राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेतील पुरुषांच्या 5000 मीटर शर्यतीत पदक जिंकणारे ते पहिलेच भारतीय ठरल्याची नोंदही त्यांनी केली.
ही कामगिरी भारतीय अॅथलेटिक्ससाठी ऐतिहासिक टप्पा असल्याचे सांगत मोदी यांनी गुलवीर सिंह यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
पंतप्रधानांनी एक्सवरील आपल्या संदेशात म्हटले आहे :
“गुलवीर सिंह यांनी इतिहास रचला आहे! राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा 2026 मधील पुरुषांच्या 5000 मीटर शर्यतीत त्यांनी कांस्यपदक जिंकले आहे. त्यांचे मनःपूर्वक अभिनंदन. या उल्लेखनीय कामगिरीमुळे एका राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत अॅथलेटिक्समध्ये दोन पदके जिंकणारे ते पहिले भारतीय खेळाडू ठरले आहेत. तसेच, राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेतील पुरुषांच्या 5000 मीटर शर्यतीत पदक जिंकणारे ते पहिलेच भारतीय आहेत. भारतीय अॅथलेटिक्ससाठी ही निश्चितच ऐतिहासिक कामगिरी आहे. त्यांना माझ्या शुभेच्छा.
#CWG2026”
History made by Gulveer Singh! He wins the Bronze Medal in the Men’s 5000 m event at the Commonwealth Games 2026. Congratulations to him. With this remarkable performance, he became the first Indian athlete to win two athletics medals at a single Commonwealth Games. He is also… pic.twitter.com/nFC2oCvP7F
— Narendra Modi (@narendramodi) August 2, 2026
***
यश राणे/हेमांगी कुलकर्णी/परशुराम कोर
***
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai@gmail.com [
0KB ]
/PIBMumbai
/pibmumbai
History made by Gulveer Singh! He wins the Bronze Medal in the Men's 5000 m event at the Commonwealth Games 2026. Congratulations to him. With this remarkable performance, he became the first Indian athlete to win two athletics medals at a single Commonwealth Games. He is also… pic.twitter.com/nFC2oCvP7F
— Narendra Modi (@narendramodi) August 2, 2026