पीएम्इंडिया
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ग्लासगो येथे आयोजित राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा 2026 मधील पुरुषांच्या 80 किलो वजनी गटातील बॉक्सिंग स्पर्धेत सुवर्णपदक जिंकल्याबद्दल अंकुश पंघल यांचे अभिनंदन केले आहे.
स्पर्धेदरम्यान अंकुश पंघल यांनी प्रदर्शित केलेल्या ताकदीचे आणि कौशल्याचे पंतप्रधानांनी कौतुक केले.
त्यांच्या भावी वाटचालीसाठी मोदी यांनी शुभेच्छा दिल्या असून, त्यांच्या या यशातून आणखी अनेक युवा बॉक्सर उत्कृष्टतेच्या दिशेने प्रेरित होतील, असा विश्वासही व्यक्त केला.
पंतप्रधानांनी एक्सवरील आपल्या संदेशात म्हटले आहे :
“राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा 2026 मधील पुरुषांच्या 80 किलो वजनी गटातील बॉक्सिंग स्पर्धेत सुवर्णपदक जिंकल्याबद्दल अंकुश पंघल यांचा अभिमान वाटतो. स्पर्धेदरम्यान त्यांनी दाखवलेली ताकद आणि कौशल्य खरोखरच वाखाणण्याजोगे होते. त्यांच्या आगामी वाटचालीसाठी शुभेच्छा. त्यांच्या या कामगिरीतून आणखी अनेक युवा बॉक्सर उत्कृष्टतेचा ध्यास घेण्यासाठी प्रेरित होवोत.
#CWG2026”
Proud of Ankush Panghal for winning the Gold Medal in the Men’s 80 kg Boxing category at the 2026 Commonwealth Games. His strength and skill were truly commendable during the games. Best wishes for his upcoming endeavours. May this feat inspire many more young boxers to pursue…
— Narendra Modi (@narendramodi) August 2, 2026
***
यश राणे/हेमांगी कुलकर्णी/परशुराम कोर
***
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai@gmail.com [
0KB ]