Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

पंतप्रधानांनी भारत–ओमान सर्वसमावेशक आर्थिक भागीदारी करार (CEPA) आणि त्याच्या फायद्यांवरील लेख केला सामायिक


नवी दिल्‍ली, 1 जून 2026

 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केंद्रीय वाणिज्य व उद्योग मंत्री पीयूष गोयल यांनी लिहिलेला एक लेख सामायिक केला आहे.

या लेखात भारत–ओमान सर्वसमावेशक आर्थिक भागीदारी करार (CEPA) भारतीय निर्यातदारांना नवीन बाजारपेठांमध्ये प्रवेश करण्याची आणि विविध वस्तूंच्या निर्यातीची संधी कशी उपलब्ध करून देतो, रोजगारनिर्मितीला कशी चालना देतो, शेतकऱ्यांच्या हितांचे संरक्षण कसे करतो आणि दोन्ही देशांमध्ये परस्पर समृद्धीला कसा हातभार लावतो, यावर प्रकाश टाकण्यात आला आहे.

तसेच, विकसित देशांसोबत व्यापार करार करण्यासाठी सरकार करत असलेल्या प्रयत्नांमुळे प्रत्येक भारतीयाचे जीवनमान उंचावण्यात मदत होत असल्याचे या लेखात अधोरेखित करण्यात आले आहे.

पंतप्रधान कार्यालयाने एक्सवर म्हटले आहे:

“या लेखात केंद्रीय मंत्री @PiyushGoyal यांनी भारत–ओमान सर्वसमावेशक आर्थिक भागीदारी करार (CEPA) भारतीय निर्यातदारांना बाजारपेठांमध्ये वैविध्यपूर्ण व्यापाराची, रोजगारनिर्मितीला चालना देण्याची, शेतकऱ्यांच्या हितांचे संरक्षण करण्याची आणि दोन्ही देशांमधील परस्परसमृद्धी वाढविण्याची संधी कशी उपलब्ध करून देतो, यावर प्रकाश टाकला आहे. तसेच, विकसित देशांसोबत व्यापार करार करण्यासाठी सरकार करत असलेल्या प्रयत्नांमुळे प्रत्येक भारतीयाचे जीवनमान उंचावण्यासाठी कशी मदत होत आहे, यावर त्यांनी भर दिला आहे.”

 

* * *

नेहा कुलकर्णी/वैभवी जोशी/दर्शना राणे

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:PM India

@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai   PM India /pibmumbai  PM Indiapibmumbai@gmail.com  PM India/PIBMumbai   PM India /pibmumbai