Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

पंतप्रधानांनी भारत – न्यूझीलंड मुक्त व्यापार करार ‘ऐतिहासिक क्षण’ असल्याचे नमूद करून केले कौतुक; करारामुळे विकास भागीदारीला अभूतपूर्व गती मिळेल : पंतप्रधान


नवी दिल्‍ली, 27 एप्रिल 2026

 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील भागीदारी हा एक ‘ऐतिहासिक क्षण’ असल्याचे नमूद करून भारत-न्यूझीलंड मुक्त व्यापार कराराची प्रशंसा केली.

ते म्हणाले की, हा करार दोन्ही देशांमधील विकास भागीदारीला अभूतपूर्व गती देईल. हा करार दोन्ही राष्ट्रांना परस्परांशी जोडून ठेवणाऱ्या गाढ विश्वास, सामायिक मूल्ये आणि महत्त्वाकांक्षा यांचे प्रतिबिंब असल्याचेही पंतप्रधानांनी म्हटले आहे.

पंतप्रधानांनी नमूद केले की, या मुक्त व्यापार कराराचा शेतकरी, तरुण, महिला, सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग, कारागीर, स्टार्ट-अप्स, विद्यार्थी आणि नवप्रवर्तकांना मोठ्या प्रमाणावर लाभ होईल. त्यांनी पुढे सांगितले की, हा करार विकासाच्या नवीन वाटा खुल्या करेल, संधी निर्माण करेल आणि विविध क्षेत्रांमधील परस्पर समन्वय अधिक दृढ करेल.

पंतप्रधान मोदी यांनी यावरही प्रकाश टाकला की, न्यूझीलंडने केलेली 20 अब्ज डॉलर्सच्या गुंतवणुकीची वचनबद्धता कृषी, उत्पादन, नवप्रवर्तन आणि तंत्रज्ञान या क्षेत्रांमधील सहकार्य अधिक बळकट करेल. यामुळे  दोन्ही देशांसाठी अधिक समृद्ध आणि गतिमान भविष्याचा मार्ग प्रशस्त होईल.

पंतप्रधानांनी ‘एक्स’ या समाज माध्‍यमावर  पोस्ट केले आहे की :

“आजचा दिवस भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील भागीदारीमधील एक ऐतिहासिक क्षण आहे !

मला अत्यंत आनंद होत आहे की, आज स्वाक्षरी करण्यात आलेला भारत-न्यूझीलंड मुक्त व्यापार करार  आमच्या विकास भागीदारीला अभूतपूर्व गती देईल. हा करार दोन्ही राष्ट्रांना परस्परांशी जोडून ठेवणाऱ्या गाढ विश्वास, सामायिक मूल्ये आणि महत्त्वाकांक्षा यांचे प्रतिबिंब आहे.

या कराराचा आमचे शेतकरी, तरुण, महिला, एमएसएमई, कारागीर, स्टार्ट-अप्स, विद्यार्थी आणि नवप्रवर्तकांना मोठ्या प्रमाणावर लाभ होईल. हा करार विकासाच्या नवीन वाटा खुल्या करेल, संधी निर्माण करेल आणि विविध क्षेत्रांमधील आमचा परस्पर समन्वय अधिक दृढ करेल.

न्यूझीलंडने केलेली 20 अब्ज डॉलर्सच्या गुंतवणुकीची वचनबद्धता कृषी, उत्पादन, नवप्रवर्तन आणि तंत्रज्ञान या क्षेत्रांमधील आमचे सहकार्य अधिक बळकट करेल. त्यामुळे  दोन्ही देशांसाठी अधिक समृद्ध आणि गतिमान भविष्याचा मार्ग प्रशस्त होईल.

@chrisluxonmp”

 

पंतप्रधान कार्यालयानेही ‘एक्स’ वरील एका पोस्टमध्ये पुढीलप्रमाणे म्हटले आहे:

“एका संदेशात, पंतप्रधान @narendramodi यांनी म्हटले आहे की, भारत-न्यूझीलंड मुक्त व्यापार करार  हे अधिक सखोल जागतिक सहभाग आणि सामायिक समृद्धीच्या दिशेने टाकलेले एक महत्त्वपूर्ण पाऊल आहे.

हा करार दोन चैतन्यशील लोकशाही राष्ट्रांमधील आर्थिक संबंध अधिक बळकट करतो; तसेच शेतकरी, कारागीर, तरुण, उद्योजक, महिला आणि एमएसएमई यांच्यासाठी संधींची दारे खुली  करतो.

हा करार शेतकरी, तरुण, एमएसएमई आणि उद्योजकांसाठी संधी निर्माण करेल. #IndiaNZFTA”

 

* * *

निलिमा चितळे/सुवर्णा बेडेकर/दर्शना राणे

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:PM India

@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai   PM India /pibmumbai  PM Indiapibmumbai@gmail.com  PM India/PIBMumbai   PM India /pibmumbai