Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

पंतप्रधानांनी मन की बातच्या 128 व्या भागाची क्षणचित्रे सामायिक केली


पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज मन की बातच्या 128 व्या भागाची क्षणचित्रे सामायिक  केली.

X वरील वेगवेगळ्या पोस्टमध्ये, मोदींनी मनोगत व्यक्त केले:

“नोव्हेंबर महिना अनेकानेक प्रेरणादायी क्षण घेऊन आला. #MannKiBaat”

“भारताने अन्नधान्य उत्पादनात ऐतिहासिक विक्रम प्रस्थापित केला आहे. #MannKiBaat”

“इस्रोने आयोजित केलेल्या अनोख्या ड्रोन स्पर्धेत पुण्यातील तरुणांच्या टीमने कसे यश मिळवले यावर पंतप्रधान @narendramodi यांनी प्रकाश टाकला. #MannKiBaat”

“भारतात मधूर क्रांती! #MannKiBaat”

“युरोपपासून सौदी अरेबियापर्यंत, जगभरात  गीता कशी साजरी केली जात आहे ते पंतप्रधान @narendramodi यांनी सामायिक केले . #MannKiBaat”

“जाम साहेबांच्या अविश्वसनीय योगदानाचा आज जगात सन्मान होत आहे… #MannKiBaat”

“अनेक तरुण, उच्च शैक्षणिक पात्रता असलेले व्यावसायिक आता नैसर्गिक शेतीचे क्षेत्र स्वीकारत आहेत हे पाहून आनंद झाला” असे पंतप्रधान @narendramodi यांनी म्हटले आहे. #MannKiBaat

“चौथा काशी-तमिळ संगम, २ डिसेंबर रोजी काशीतील नमो घाट येथे सुरू होत आहे.

पंतप्रधान @narendramodi यांनी सर्वांना काशी-तमिळ संगमचा भाग होण्याचे आवाहन केले . #MannKiBaat”

“आयएनएस माहे भारतीय नौदलात सामील करण्यात आली आहे. तिच्या स्वदेशी डिझाइनचे व्यापक स्तरावर कौतुक होत आहे. #MannKiBaat”

“उत्तराखंडमधील हिवाळी पर्यटन खूप लोकांना आकर्षित करत आहे. #MannKiBaat”

“भगवान बुद्धांच्या पवित्र अवशेषांबद्दल अनेक देशांमध्ये उत्सुकता दिसून येत आहे. जगभरातील लोकांनी बौद्ध अवशेष पाठवल्याबद्दल भारताचे आभार मानले आहेत. #MannKiBaat”

“व्होकल फॉर लोकल! #MannKiBaat”

“भारताचा सर्वाधिक यशस्वी क्रीडा महिना .  #MannKiBaat”

नोव्हेंबर हा महिना 140 कोटी भारतीयांना अभिमान वाटावा अशा  अनेक घटनांचा महिना ठरला. त्यापैकी काही घटना. –

अयोध्येतील धर्मध्वजारोहण उत्सव,

भगवान बिरसा मुंडा यांच्या 150 व्या जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रम,

वंदे मातरम्’ची 150 वर्षे,

जागतिक एमआरओ (देखभाल, दुरुस्ती आणि ओव्हर हॉल) केंद्र बनण्याच्या दिशेने भारताची आगेकूच

आयएनएस माहे नौदलाच्या ताफ्यात दाखल – बळ आणि आत्मनिर्भरतेचे प्रभावी प्रतीक,

स्कायरूट एरोस्पेसच्या ‘इन्फिनिटी कॅम्पस’चे उद्घाटन,

भारताने अन्नधान्य उत्पादनात नवा विक्रम नोंदवला.

#MannKiBaat”

तंत्रज्ञान आणि नवोन्मेषाच्या क्षेत्रात भारताची जेन- झेड पिढी विश्वसनीय कार्य करत आहे. आपल्या तरुणांचा ड्रोन तंत्रज्ञानावरील उत्कटतेची अनुभूती देणाऱ्या एका उपक्रमाचा उल्लेख केला.

#MannKiBaat”

जम्मू-काश्मीरपासून ते कर्नाटक आणि नागालँडपर्यंत, देशातील शेतकरी मध उत्पादनात उल्लेखनीय यश मिळवत आहेत. या क्षेत्रातील प्रयत्नांसाठी खादी आणि ग्रामोद्योग आयोगचेही कौतुक केले.

#MannKiBaat”

सौदी अरेबिया आणि लाट्विया येथील ‘गीता महोत्सव’ हे महत्त्वाचे उपक्रम असून, ते भारतीय प्रवासी समुदायाशी तसेच भारतीय संस्कृती व आध्यात्म्याविषयी प्रेम असणाऱ्या लोकांशी सांस्कृतिक नाते अधिक दृढ करतात.

#MannKiBaat”

इस्रायलमध्ये जाम साहेब दिग्विजयसिंहजी यांच्या मानवतावादी  सेवाभावाला दिलेल्या विशेष आदरांजली विषयीही उल्लेख केला.

#MannKiBaat”

काशीमध्ये मध्ये होणाऱ्या ‘काशी तमिळ संगमम्’च्या आयोजनाबद्दल उत्साह दिसून येत आहे.

#MannKiBaat”

भारतात या, विवाह करा!

#MannKiBaat”

भारतातील बौद्ध अवशेषांना  भूतान, थायलंड, रशिया, मंगोलिया आणि इतर देशांत मिळालेल्या विशेष आदरातिथ्यामुळे भगवान बुद्धांच्या विचारांचे सार्वत्रिक महत्त्व अधोरेखित होते आणि ते आपल्याला एकमेकांशी जोडतात  आणि प्रेरणा देतात.

#MannKiBaat”

***

सुषमा काणे/पर्णिका हेदवकर/राज दळेकर/परशुराम कोर

***

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:PM India@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai   PM India /pibmumbai  PM Indiapibmumbai@gmail.com [ PM India 0KB ]   PM India/PIBMumbai   PM India /pibmumbai