Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

पंतप्रधानांनी ‘मन की बात’च्या 134 व्या भागातील ठळक मुद्दे केले सामाईक


नवी दिल्ली, 31 मे 2026

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘मन की बात’ च्या 134 व्या भागातील आपल्या संबोधनातील ठळक मुद्दे सामाईक केले आहेत.

एक्सवरील पोस्टच्या मालिकेत पंतप्रधानांनी सांगीतले:

“गुरिंदरवीर सिंह आणि अनिमेष कुजूर यांच्याशी झालेला संवाद अतिशय विशेष होता. भारतीय ॲथलेटिक्सचे भविष्य किती उज्ज्वल आहे, याची झलक या संवादातून पाहायला मिळाली!

 #MannKiBaat”

“भारतातील आंबे आणि आंब्यांच्या विविधतेचा विशेष उल्लेख करायलाच हवा! तुमचा आवडता आंबा कोणता?”

#MannKiBaat

“उन्हाळ्याच्या उकाड्यावर मात करण्याचा एक उत्तम मार्ग म्हणजे पोहणे. मन की बात दरम्यान मी केरळमधील साजीजी यांच्या प्रयत्नांचा उल्लेख केला, जे भावी जलतरणपटूंना प्रशिक्षण देत आहेत!”

#MannKiBaat

“भारतभर अनेक खगोलशास्त्र मंडळे आणि संस्था युवकांमध्ये खगोलशास्त्र लोकप्रिय करण्यासाठी कार्यरत आहेत. अशा प्रत्येक प्रयत्नाचा मला अभिमान आहे.”

#MannKiBaat

“उत्तर प्रदेशातील डॉल्फिन बचाव रुग्णवाहिका उल्लेखनीय कार्य करत आहे आणि आपण ज्या सजीवांसोबत ही पृथ्वी सामाईक करतो, त्यांची काळजी घेण्याचा महत्त्वाचा संदेश देत आहे.”

#MannKiBaat

“उत्तर प्रदेशातील आकाश गुप्ता आणि गोव्यातील बाळकृष्ण अय्या यांसारखे व्यक्ती जलसंवर्धनाच्या कार्यात आघाडीवर आहेत आणि शाश्वत विकासाचा महत्त्वपूर्ण संदेश देत आहेत.”

#MannKiBaat

“तामिळनाडूमधील गिरिजा अम्मा यांच्याशी झालेल्या भेटीची आठवण करून दिली आणि राष्ट्रनिर्माणासाठी असलेल्या त्यांच्या अतुलनीय समर्पणाचा उल्लेख केला. तसेच शिक्षण क्षेत्रातील कार्यासाठी जयगोपाल गरोडिया हिंदू विद्यालय शाळांचेही कौतुक केले.”

#MannKiBaat

“नेदरलँड्स दौऱ्यानंतर भारतात परत आलेल्या चोल ताम्रपटांबाबत मोठी उत्सुकता निर्माण झाली आहे. त्यामुळे मन की बात मध्ये त्याचा उल्लेख केला. तसेच छत्तीसगडमध्ये अलीकडेच सापडलेल्या तीन दुर्मिळ ताम्रपटांविषयीही माहिती सामाईक केली.”

#MannKiBaat

राधिका अघोर/गजेंद्र देवडा/प्रिती मालंडकर

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:PM India@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai   PM India /pibmumbai  PM Indiapibmumbai[at]gmail[dot]com  PM India/PIBMumbai   PM India /pibmumbai