पीएम्इंडिया
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘मन की बात’ च्या 136 व्या भागातील आपल्या भाषणातील मुख्य मुद्दे मांडले आहेत.
‘एक्स’ (X) समाज माध्यमावरील टिप्पण्यांच्या मालिकेत मोदी म्हणाले;
“आपल्या देशाचे रक्षण करणाऱ्या आणि देशाला अधिक बलवंत बनवणाऱ्या सर्वांना सलाम!
#MannKiBaat”
Salute to all those who protect our nation and make it even stronger! #MannKiBaat pic.twitter.com/G0qWKhL53j
— Narendra Modi (@narendramodi) July 26, 2026
“‘कॅच द रेन’ (पावसाचं पाणी साठवा) मोहिमेचा संदेश सोपा आहे… पाण्याचे प्रभावीपणे संवर्धन करणे. या संदर्भात मध्य प्रदेश, महाराष्ट्र, आंध्र प्रदेश, छत्तीसगड आणि ओदिशातील प्रयत्नांचा विशेष उल्लेख केला.
#MannKiBaat”
‘Catch the Rain’ campaign has a simple message…to conserve water effectively. Highlighted efforts from Madhya Pradesh, Maharashtra, Andhra Pradesh, Chhattisgarh and Odisha in this regard. #MannKiBaat pic.twitter.com/qOXWwLQOCC
— Narendra Modi (@narendramodi) July 26, 2026
“कष्टाने मिळालेला विजय विशेष असतो, पण तो जेव्हा एखाद्या ऐतिहासिक मैदानावर मिळतो, तेव्हा आनंद द्विगुणीत होतो!
आपल्या महिला क्रिकेट संघाने जेव्हा ‘लॉर्ड्स’ मैदानावर विजय मिळवला, तेव्हा अगदी हेच घडले! संघाचे अभिनंदन आणि त्यांच्या पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा.
#MannKiBaat”
A hard-earned victory is special, but when it happens at an iconic venue, it adds to the joy!
This is exactly what happened when our women’s cricket team won at Lord’s! Congratulations to the team and best wishes for their endeavours ahead. #MannKiBaat pic.twitter.com/A08ngF3rwd
— Narendra Modi (@narendramodi) July 26, 2026
“केरळमधील एर्नाकुलम येथे एक अनोखा उपक्रम होत आहे. यात फुटबॉलला संस्कृत भाषेसोबत सुंदरपणे जोडले आहे.
#MannKiBaat”
In Ernakulam, Keralam, a unique effort took place that beautifully merges football with Sanskrit. #MannKiBaat pic.twitter.com/cZYqSEuVwK
— Narendra Modi (@narendramodi) July 26, 2026
കേരളത്തിലെ എറണാകുളത്ത്, ഫുട്ബോളിനെയും സംസ്കൃതത്തെയും മനോഹരമായി സമന്വയിപ്പിക്കുന്ന ഒരു വേറിട്ട ശ്രമം നടന്നു.#MannKiBaat pic.twitter.com/YS5xeyd9ti
— Narendra Modi (@narendramodi) July 26, 2026
“गेला महिना विज्ञान आणि अंतराळ क्षेत्रासाठी उत्कृष्ट राहिला आहे. ‘विक्रम-1’ च्या यशाने संपूर्ण देशाचे लक्ष वेधून घेतले आहे. त्याच वेळी, विविध ऑलिंपियाडमधील यश निश्चितच अधिकाधिक तरुणांना विज्ञानात उत्कृष्ट कामगिरी करण्यासाठी प्रेरित करेल.
#MannKiBaat”
The last month has been outstanding for science and space. Vikram-1’s success has captured the imagination of the entire nation. At the same time, the successes in various Olympiads will surely motivate more youngsters to excel in the sciences. #MannKiBaat pic.twitter.com/ZhFhVc9mFt
— Narendra Modi (@narendramodi) July 26, 2026
“जम्मू आणि कश्मीरमध्ये ‘वागू’ चटई परंपरेचे पुनरुज्जीवन आणि ती लोकप्रिय करण्यासाठी केलेल्या प्रयत्नांचा अभिमान वाटतो… मी तुम्हा सर्वांना विनंती करतो की, तुम्हीही तुमच्या घरी एक वागू नक्की आणा.
#MannKiBaat”
Proud of an effort in Jammu and Kashmir to revive and popularise Wagoo…I urge you all to get one in your homes too. #MannKiBaat pic.twitter.com/H9JxOSYouM
— Narendra Modi (@narendramodi) July 26, 2026
“गुजरात आणि उत्तर प्रदेशातील उल्लेखनीय प्रयत्न आपण निसर्गाला किती महत्त्व देतो हे दर्शवतात.
#MannKiBaat”
Noteworthy efforts in Gujarat and Uttar Pradesh showcase the importance we attach to nature. #MannKiBaat pic.twitter.com/xjr7HPhh0S
— Narendra Modi (@narendramodi) July 26, 2026
“डॉ. रोनाल्डो लैशराम यांच्या कृतीने हे दाखवून दिले आहे की, उत्तम कामगिरी बजावूनही आणि यश मिळूनही माणूस नेहमी आपल्या मुळांशी जोडलेला राहतो.
#MannKiBaat”
Dr. Ronaldo Laishram’s gesture has shown that despite successes and accomplishments, one is always connected to their roots. #MannKiBaat pic.twitter.com/Y7dZLJmn13
— Narendra Modi (@narendramodi) July 26, 2026
“खादीचे पुनरुज्जीवन मोठ्या प्रमाणावर होत असून, गेल्या 12 वर्षांत तिच्या विक्रीत लक्षणीय वाढ झाली आहे. या वाढत्या लोकप्रियतेमुळे स्थानिक उद्योगांना बळ मिळत आहे आणि हजारो कारागिरांसाठी संधी निर्माण होत आहेत. येत्या सणासुदीच्या काळात आपण सर्वांनी किमान एक तरी खादीचे उत्पादन खरेदी करूया आणि स्थानिक उत्पादनांच्या खरेदीच्या (व्होकल फॉर लोकल’) आग्रहाला अधिक गती देऊया.
#MannKiBaat”
Khadi is witnessing a remarkable resurgence, with its sales rising significantly over the last 12 years. This growing popularity is strengthening local enterprise and creating opportunities for countless artisans. During the upcoming festive season, let us buy at least one Khadi… pic.twitter.com/1ghCtveExz
— Narendra Modi (@narendramodi) July 26, 2026
“त्रिपुरातील श्री सुर्जा कुमार देबबर्मा जी यांनी ‘चोंगप्रेन्ग’ वाद्याला लोकप्रिय करण्यासाठी केलेले कार्य कौतुकास्पद आहे. आपल्या संगीत परंपरा आजही किती जिवंत आहेत हे यावरून दिसून येते.
#MannKiBaat”
The work of Shri Surja Kumar Debbarma Ji from Tripura in popularising the Chongpreng is commendable. And, it highlights how our musical traditions have remained vibrant for several years. #MannKiBaat pic.twitter.com/cgJAFqvT7v
— Narendra Modi (@narendramodi) July 26, 2026
“उत्तर प्रदेशातील बिजनौर जिल्ह्यातील बचतगटांच्या महिलांनी एक असा स्वदेशी हर्बल (औषधी) चहा तयार केला आहे, ज्याने अनेक माता-भगिनींच्या आयुष्यात आत्मनिर्भरतेचा नवा सुगंध भरला आहे. आपल्या अनोख्या चव आणि गुणांमुळे त्यांच्या ब्रँडने अतिशय कमी वेळात लोकांमध्ये एक विशेष ओळख निर्माण केली आहे.
#MannKiBaat”
उत्तर प्रदेश में बिजनौर जिले के सेल्फ हेल्प ग्रुप से जुड़ी महिलाओं ने एक ऐसी स्वदेशी हर्बल टी तैयार की है, जिसने कई माताओं-बहनों के जीवन में आत्मनिर्भरता की नई खुशबू घोल दी है। अपने अनोखे स्वाद और गुणों की वजह से उनके ब्रांड ने बहुत कम समय में ही लोगों के बीच खास पहचान बना ली है।… pic.twitter.com/KrvO6mFvIX
— Narendra Modi (@narendramodi) July 26, 2026
“बिहारमधील सीतामढी येथे सिंगल युज प्लास्टिक (एकदा वापरुन फेका) च्या कचऱ्यापासून आकर्षक आणि टिकाऊ बाकडी तयार केली जात आहेत. ‘वेस्ट टू वेल्थ’ (कचऱ्यापासून उपयुक्त वस्तू) चा हा अनोखा प्रयत्न दर्शवतो की रिड्यूस (कमी वापर), रियूज (पुनर्वापर) आणि रिसायकल (पुनर्प्रक्रिया) ही आता केवळ एक घोषणा राहिलेली नसून ती जीवनशैलीचा भाग बनत आहे.
#MannKiBaat”
बिहार के सीतामढ़ी में सिंगल यूज प्लास्टिक के कचरे से आकर्षक और टिकाऊ बेंच बनाई जा रही है। Waste to Wealth का यह अनोखा प्रयास बताता है कि Reduce, Reuse और Recycle आज केवल एक नारा नहीं, बल्कि जीवन का हिस्सा बनता जा रहा है।#MannKiBaat pic.twitter.com/tIeZoXZcO4
— Narendra Modi (@narendramodi) July 26, 2026
“मला या गोष्टीचा खूप आनंद आहे की, गणेशोत्सवात मातीची मूर्ती बनवण्याच्या माझ्या आवाहनाला देशवासीयांनी अतिशय सकारात्मक प्रतिसाद दिला आहे. त्यांनी मला पाठवलेल्या संदेशांमधून गणपतीच्या भक्तीसोबतच निसर्गाप्रती असलेली त्यांची समर्पणाची भावना दिसून येते.
#MannKiBaat”
मुझे इस बात की बहुत प्रसन्नता है कि गणेश उत्सव पर मिट्टी की प्रतिमा बनाने के मेरे आग्रह पर देशवासियों ने बहुत सकारात्मक रुख दिखाया है। उन्होंने मुझे जो संदेश भेजे हैं, उनसे गणपति की भक्ति के साथ-साथ प्रकृति के प्रति उनके समर्पण भाव का पता चलता है।#MannKiBaat pic.twitter.com/V9jpUNKUCY
— Narendra Modi (@narendramodi) July 26, 2026
***
सुषमा काणे/आशुतोष सावे/परशुराम कोर
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai@gmail.com [
0KB ]