पीएम्इंडिया
नवी दिल्ली, 1 जून 2026
पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि म्यानमारचे राष्ट्राध्यक्ष यु मीन आँग हलॅँग यांच्यात आज फलदायी चर्चा झाली.
राष्ट्राध्यक्ष यु मीन आँग हलॅँग यांनी त्यांच्या पदाची सूत्रे हाती घेतल्यानंतर त्यांच्या पहिल्या परदेश दौऱ्यासाठी भारताची निवड केली हा भारताचा मोठा गौरव आहे असे पंतप्रधान मोदी यांनी नमूद केले. राष्ट्राध्यक्षांनी भगवान बुद्धांच्या आशीर्वादासह बोधगया येथून त्यांच्या भारतातील कार्यक्रमाला सुरुवात केल्याबद्दल देखील पंतप्रधानांनी आनंद व्यक्त केला.
यावेळी झालेल्या चर्चेदरम्यान दोन्ही नेत्यांनी भारत-म्यानमार संबंधांच्या संपूर्ण श्रेणीचा आढावा घेतला आणि या देशांतील द्विपक्षीय सहकार्य आणखी मजबूत करण्यासाठीच्या मार्गांची चर्चा केली.
व्यापार, दुर्मिळ भू-धातू, आरोग्यसुविधा, संपर्क व्यवस्था, वारसा जीर्णोद्धार आणि क्षमता निर्मिती या क्षेत्रांतील सहकार्य आणखी दृढ करण्यासाठीच्या मार्गांबाबत यावेळी चर्चा झाली. सागरी सुरक्षा, सायबर सुरक्षा तसेच परस्पर स्वारस्याच्या इतर क्षेत्रांमध्ये एकत्र येऊन काम करण्याबाबत देखील दोन्ही बाजूंचे एकमत झाले.
भारत म्यानमारशी असलेल्या संबंधांना किती महत्त्व देतो याचा पुनरुच्चार करत पंतप्रधान मोदी यांनी म्यानमार हा देश भारताच्या ‘शेजारी राष्ट्र सर्वप्रथम’, ‘पूर्वेकडील देशांसाठी कृती’ आणि हिंद-प्रशांत धोरणे यांसंदर्भात अत्यंत महत्त्वाचा आहे हे अधोरेखित केले.
एक्स मंचावर लिहिलेल्या संदेशात पंतप्रधान म्हणतात;
“म्यानमारचे राष्ट्राध्यक्ष यु मीन आँग हलॅँग यांच्याशी फलदायी चर्चा झाली. राष्ट्राध्यक्ष म्हणून त्यांनी त्यांच्या पहिल्या परदेश दौऱ्यासाठी भारताची निवड केली हा आपला गौरव आहे. तसेच त्यांनी भगवान बुद्धांच्या आशीर्वादासह बोधगया येथून त्यांच्या दौऱ्याला सुरुवात केली हे देखील तितकेच आनंददायी आहे. आम्ही भारत-म्यानमार संबंधांच्या संपूर्ण श्रेणीचा आढावा घेतला. म्यानमार हा देश भारताच्या ‘शेजारी राष्ट्र सर्वप्रथम’, ‘पूर्वेकडील देशांसाठी कृती’ आणि हिंद-प्रशांत या धोरणांच्या संदर्भात अत्यंत महत्त्वाचा आहे.”
“आमच्यात झालेल्या चर्चांमध्ये व्यापार, दुर्मिळ भू-धातू, आरोग्यसुविधा, संपर्क व्यवस्था, वारसा जीर्णोद्धार आणि क्षमता निर्मिती या क्षेत्रांतील सहकार्य आणखी दृढ करण्यासाठीच्या मार्गांचा समावेश होता. सागरी सुरक्षा, सायबर सुरक्षा तसेच इतर क्षेत्रांमध्ये एकत्र येऊन काम करण्याबाबत देखील आमचे एकमत झाले.”
Had a productive meeting with President U Min Aung Hlaing of Myanmar. We in India are honoured that he has chosen India for his first foreign visit as President. Equally gladdening is the fact that he began the visit from Bodh Gaya, with the blessings of Lord Buddha. We reviewed… pic.twitter.com/eL1sXgsrE6
— Narendra Modi (@narendramodi) June 1, 2026
* * *
सुषमा काणे/संजना चिटणीस/दर्शना राणे
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:![]()
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai@gmail.com
/PIBMumbai
/pibmumbai
Had a productive meeting with President U Min Aung Hlaing of Myanmar. We in India are honoured that he has chosen India for his first foreign visit as President. Equally gladdening is the fact that he began the visit from Bodh Gaya, with the blessings of Lord Buddha. We reviewed… pic.twitter.com/eL1sXgsrE6
— Narendra Modi (@narendramodi) June 1, 2026
Our talks covered ways to deepen cooperation in trade, rare earths, healthcare, connectivity, heritage restoration and capacity building. We also agreed to work closely in areas such as maritime security, cyber security and more. pic.twitter.com/1xTyJ2RiI0
— Narendra Modi (@narendramodi) June 1, 2026