Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

पंतप्रधानांनी लान्स नाईक हनुमंथप्पा यांची रुग्णालयात भेट घेतली

पंतप्रधानांनी लान्स नाईक हनुमंथप्पा यांची रुग्णालयात भेट घेतली


पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज सियाचीन येथील हिमवादळात बचावलेल्या लान्स नाईक हनुमंथप्पा यांची रुग्णालयात भेट घेतली. या जवानाला सियाचीनमधून विमानाने दिल्लीला आणून लष्कराच्या आर ॲन्ड आर रुग्णालयात आज दाखल करण्यात आले.

यावेळी लान्स नाईक हनुमंथप्पा यांच्या प्रकृतीविषयी पंतप्रधानांना माहिती देण्यात आली. त्यांनी या जवानासोबत दहा मिनिटे घालवली. लान्स नाईक हनुमंथप्पा यांच्यावर उपचार करणाऱ्या डॉक्टर्स आणि वैद्यकीय कर्मचाऱ्यांना ते भेटले आणि त्यांच्यावरील उपचारांमध्ये काहीही कमी पडू न देण्यावर त्यांनी भर दिला.

पंतप्रधान म्हणाले, “लान्स नाईक हनुमंथप्पा यांची सहनशक्ती आणि अदम्य साहस यांचे वर्णन करण्यासाठी शब्द अपुरे पडतील. ते एक महान सैनिक आहेत”.

लष्करप्रमुख जनरल दलबीर सिंग हे देखील यावेळी उपस्थित होते.

S.Kane/ S.Tupe/ M.Desai