पीएम्इंडिया
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुरुवारी, वॉशिंग्टन डीसी येथे लेझर इंटरफेरोमीटर ग्रॅव्हीटेशनल वेव्ह ऑब्झरव्हेटरी (लिगो) च्या शास्त्रज्ञांच्या पथकाची भेट घेतली. नॅशनल सायन्स फाऊंडेशनचे संचालक डॉ. फ्रान्स कोर्डोव्हा यांच्या नेतृत्वाखालील या पथकात “लिगो” प्रकल्पावर कार्य केलेल्या तीन भारतीय शास्त्रज्ञाचांही समावेश होता.
“लिगो” प्रकल्पाच्या भविष्यासाठी भारत किती महत्त्वपूर्ण आहे याबाबत डॉ. कोर्डोव्हा यांनी माहिती दिली. “लिगो” प्रकल्प हे भारतीय-अमेरिकन शास्त्रज्ञांच्या सहकार्याचे उत्तम उदाहरण असल्याचे पंतप्रधानांनी सांगितले. या प्रकल्पाच्या यशामुळे भारतीय शास्त्रज्ञांच्या संपूर्ण नव्या पिढीला प्रेरणा मिळेल, असे पंतप्रधान म्हणाले. “लिगो” प्रकल्पात सहभागी असणाऱ्या भारतीय शास्त्रज्ञांनी भारतीय विद्यार्थ्यांसोबत संवाद साधावा आणि जेवढे शक्य होईल, तेवढया वेळा भारतीय विद्यापीठांना भेट द्यावी, असे पंतप्रधानांनी सांगितले.
लिगो प्रकल्पावर काम करणाऱ्या प्लाझमा संशोधन संस्थेच्या शास्त्रज्ञांची नवी दिल्ली पंतप्रधानांनी घेतलेल्या भेटीनंतर केवळ दोनच दिवसात पंतप्रधानांची वॉशिंग्टन डीसी येथे “लिगो” शास्त्रज्ञांशी भेट झाली.
पंतप्रधानांच्या उपस्थितीत भारतात लिगो प्रयोगशाळेची स्थापना करण्यासंदर्भातील सामंजस्य कराराची देवाण-घेवाण झाली. अमेरिकन नॅशनल सायन्स फाऊंडेशनचे संचालक, डॉ. फ्रान्स कोर्डोव्हा आणि भारतीय अणुऊर्जा विभागाचे सचिव डॉ. शेखर बसू यांनी या करारावर स्वाक्षऱ्या केल्या.
J.Patnakar/S.Tupe/M.Desai
Insightful interaction with scientists from LIGO, including 3 young Indian scientists who worked on LIGO project. pic.twitter.com/dlEUjZzrc4
— Narendra Modi (@narendramodi) March 31, 2016
LIGO project is a great example of India-USA ties & will surely inspire several young science enthusiasts in India. https://t.co/hdoiykgtWy
— Narendra Modi (@narendramodi) March 31, 2016