पीएम्इंडिया
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशी यांचा एक लेख समाज माध्यमावर सामायिक केला आहे; या लेखात ‘ई-जागृती’ प्रणालीद्वारे ग्राहकांच्या तक्रार निवारणाच्या संपूर्ण चक्रातील प्रत्येक टप्प्याचे डिजिटलायझेशन करून बहुविध समस्या कशा प्रकारे मार्गी लावल्या जात आहेत याची सविस्तरपणे माहिती देण्यात आली आहे. मोदींनी हा लेख सामायिक करताना, “विविध भागधारकांशी सल्लामसलत करून ‘ई-जागृती’ प्रणाली अधिक निर्दोष केल्याने ग्राहक न्याय क्षेत्राला संरचनात्मक डिजिटल सुधारणा होणाऱ्या क्षेत्रांमध्ये कसे स्थान मिळाले आहे हे देखील त्यांनी यामध्ये मांडले आहे,” असे म्हटले आहे.
एक्स समाज माध्यमावरील पोस्टमध्ये पंतप्रधान म्हणतात:
या लेखात, केंद्रीय मंत्री श्री @JoshiPralhad यांनी ‘ई-जागृती’ कशा प्रकारे ग्राहक तक्रारीच्या संपूर्ण जीवनचक्राचे डिजिटलायझेशन करून विविध समस्यांवर कशा प्रकारे तोडगा काढत आहे, याची सविस्तर माहिती दिली आहे. संबंधित घटकांशी सखोल चर्चा केल्यानंतर ‘ई-जागृती’ प्रणालीमध्ये सुधारणा करण्यात आली असल्यामुळे संरचनात्मक डिजिटल सुधारणांच्या टप्प्यातून जात असलेल्या क्षेत्रांमध्ये ‘ग्राहक न्याय’ या क्षेत्राची कशी वर्णी लागली आहे हे देखील त्यांनी या लेखात नमूद केले आहे.
In this article, Union Minister Shri @JoshiPralhad elaborates on how e-Jagriti addresses multiple challenges by digitising the entire lifecycle of a consumer complaint.
He notes that, following extensive consultations with stakeholders, e-Jagriti has been refined, placing… pic.twitter.com/KJM6w1g1eT
— PMO India (@PMOIndia) July 4, 2026
***
शैलेश पाटील/मंजिरी गानू/परशुराम कोर
***
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai@gmail.com [
0KB ]