Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

पंतप्रधानांनी सोमनाथ अमृत महोत्सवातील आपल्या संबोधनाची काही क्षणचित्रे केली सामायिक

पंतप्रधानांनी सोमनाथ अमृत महोत्सवातील आपल्या संबोधनाची काही क्षणचित्रे केली सामायिक


नवी दिल्ली, 11 मे 2026

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज सोमनाथ अमृत महोत्सवातील आपल्या संबोधनाची काही क्षणचित्रे  सामायिक केली. हा महोत्सव केवळ भूतकाळाचा उत्सव नसून, आगामी एक हजार वर्षांसाठी भारताच्या प्रेरणेचा उत्सव असल्याची बाब त्यांनी आपल्या संबोधनातून अधोरेखित केली.

यासंदर्भात X या समाज माध्यमावर त्यांनी सामायिक केलेली संदेश मालिका,

सोमनाथ अमृत महोत्सव केवळ भूतकाळाचा उत्सव नाही. हा पुढच्या एक हजार वर्षांसाठीचा भारताच्या प्रेरणेचा महोत्सव देखील आहे.

1998 साली पोखरणमध्ये केलेल्या अणुचाचणीतून जगाला भारताच्या शास्त्रज्ञांच्या सामर्थ्याची जाणीव झाली. त्यानंतर देशाने प्रत्येक प्रकारच्या संकटाचा ज्या समर्थपणे सामना केला, ते पाहून जगही थक्क झाले.

सरदार पटेल, डॉ. राजेंद्र प्रसाद आणि के. एम. मुंशी यांच्यासह आपल्या देशात अशी असंख्य महान व्यक्तिमत्वे होऊन गेली, ज्यांनी सोमनाथाच्या सेवेसाठी सर्वस्व अर्पण केले. त्यांचे पुण्यस्मरण आपल्याला प्रेरणा देते की, आपण भारतीयांनी आपला सांस्कृतिक वारसा निरंतर पुढे न्यायचा आहे.

आपली सांस्कृतिक स्थळे हजारो वर्षांपासून भारताची ओळख राहिली आहेत. परंतु दुर्दैवाने देशात आजही असेही लोक आहेत, ज्यांच्यासाठी सोमनाथासारख्या राष्ट्रीय स्वाभिमानाच्या विषयापेक्षा तुष्टीकरण अधिक महत्त्वाचे आहे.

मला देशभरातील पवित्र तीर्थक्षेत्रांचा विकास करण्याचे सौभाग्य लाभले आहे आणि पवित्र सोमनाथ परिसर देखील याचेच एक ठळक उदाहरण आहे.

75 वर्षांपूर्वी जेव्हा पुनर्बांधणी केलेल्या सोमनाथ मंदिरात प्राणप्रतिष्ठा झाली, तेव्हा भारताने एका नवीन प्रवासाला सुरुवात केली.आज ही वाटचाल अधिक व्यापक स्वरूपात आपल्यासमोर आहे, जी आपल्याला नवीन उंचीवर घेऊन जायची आहे.

सुषमा काणे/तुषार पवार/प्रिती मालंडकर

 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:PM India@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai   PM India /pibmumbai  PM Indiapibmumbai[at]gmail[dot]com  PM India/PIBMumbai   PM India /pibmumbai