Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

पंतप्रधानानी सिक्कीमच्या जनतेला दिल्या राज्याच्या स्थापना दिनानिमित्त शुभेच्छा


पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज सिक्कीमच्या स्थापना दिनानिमित्त राज्यातील जनतेला शुभेच्छा दिल्या आहेत. सिक्कीम या वर्षी आपला 50 वा स्थापना दिन साजरा करत असल्याने हा एक ऐतिहासिक टप्पा आहे. भारताच्या विकास प्रवासात सिक्कीमचे योगदान अतिशय बहुमूल्य आणि प्रशंसनीय आहे, असे मोदी यांनी सांगितले. 50 व्या स्थापना दिन सोहळ्यादरम्यान आपल्या नुकत्याच झालेल्या सिक्कीम दौऱ्याची आठवण काढत पंतप्रधान म्हणाले की, या राज्यातील जनतेने दाखवलेल्या आपुलकीने आणि प्रेमाने ते मनापासून भारावून गेले होते.

मोदी यांनी एक्सवर पोस्ट केलेः

“ सिक्कीमच्या माझ्या बंधू-भगिनींना त्यांच्या राज्य स्थापना दिनानिमित्त हार्दिक शुभेच्छा. भारताच्या विकासातील सिक्कीमचे योगदान अत्यंत मोलाचे आहे. राज्यातील जनतेला उत्तम आरोग्य आणि समृद्धी लाभो, हीच प्रार्थना. 

हा प्रसंग अशा वेळी आला आहे, जेव्हा सिक्कीम आपला 50 वा स्थापना दिन सोहळा साजरा करत आहे. काही दिवसांपूर्वीच या सोहळ्यानिमित्त मला सिक्कीमच्या लोकांमध्ये उपस्थित राहण्याचे भाग्य लाभले होते. सिक्कीममध्ये मला मिळालेले प्रेम आणि आपुलकी माझ्या स्मरणात कायम राहील. केंद्र सरकार आगामी काळातही सिक्कीमच्या विकास प्रवासाला सातत्याने पाठबळ देत राहील.”

***

अंबादास यादव/शैलेश पाटील/परशुराम कोर

***

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:PM India@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai   PM India /pibmumbai  PM Indiapibmumbai@gmail.com [ PM India 0KB ]   PM India/PIBMumbai   PM India /pibmumbai