पीएम्इंडिया
गुजरातचे मुख्यमंत्री विजय रुपानी यांनी आज सकाळी संसद भवन येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. यावेळी रुपानी यांनी गुजरातमध्ये पडत असलेल्या अविरत पाऊस आणि त्यामुळे निर्माण झालेल्या पूर परिस्थितीची माहिती पंतप्रधानांना दिली.
नवीन राष्ट्रपतींचा शपथविधी सोहळा झाल्यानंतर पंतप्रधानांनी उत्तर गुजरातच्या पूरग्रस्त भागाचे हवाई सर्वेक्षण करण्याचा निर्णय घेतला आहे.
B.Gokhale/S.Mhatre/P.Kor