Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

पंतप्रधान आवास योजनेची पंतप्रधानांच्या हस्ते कोनशिला

पंतप्रधान आवास योजनेची पंतप्रधानांच्या हस्ते कोनशिला


पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत बांधण्यात येणाऱ्या गृहप्रकल्पाच्या कोनशिलेचे अनावरण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज झाले. छत्तीसगडमधल्या नया रायपूर येथे झालेल्या कार्यक्रमात पंतप्रधानांनी इलेक्ट्रॉनिक उत्पादन समूहाच्या कोनशिलेचेही अनावरण केले. तसेच छत्तीसगडच्या नाविन्यपूर्ण शोध आणि उद्योजकता विकास धोरणाचे प्रकाशनही केले.

स्वत:चे घर बांधायला असमर्थ ठरलेल्या लोकांसाठी पंतप्रधान आवास योजना उपयुक्त ठरेल असे पंतप्रधानांनी यावेळी बोलताना सांगितले. ही योजना म्हणजे केवळ पायाभूत सुविधांची उभारणी नव्‍हे तर गरिबांचे स्वप्न साकार करण्याचे एक माध्यम आहे असे ते म्हणाले. या योजनेमुळे मोठया आर्थिक घडामोडींना चालना मिळेल असे सांगून सर्व राज्यातल्या स्थानिक संस्थांनी या योजनेच्या अंमलबजावणीत पुढाकार घेण्याचे आवाहन त्यांनी केले. 2022 पर्यंत सर्वांना घर या उद्दिष्टाच्या पूर्ततेच्या दिशेने टाकलेले पाऊल असल्याचे पंतप्रधान म्हणाले.

नाविन्यपूर्ण शोध, आणि उद्योजकता धोरणाबद्दल पंतप्रधानांनी छत्तीसगड सरकारचे अभिनंदन केले. गेल्या पन्नास वर्षात ज्या देशांनी शोधांवर भर दिला त्या देशांचा फायदाच झाला तसेच त्यांची आर्थिक भरभराट झाल्याचे त्यांनी सांगितले. केंद्र सरकारच्या कौशल्य विकास, मुद्रा योजना यासारख्या उपक्रमांची त्यांनी माहिती दिली. याआधी पंतप्रधानांनी सत्य साईबाबांच्या मूर्तीचे अनावरण केले. मानव विकास केंद्र-श्री सत्य साई सौभाग्यमचे उद्‌घाटन केले तसेच बाल आरोग्य कल्याणासाठीचे श्री सत्य साई संजीवनी केंद्र राष्ट्राला समर्पित केले.

N.Chitale/S.Tupe/M.Desai