पीएम्इंडिया
नवी दिल्ली, 7 ऑगस्ट 2025
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना आज ब्राझीलचे राष्ट्राध्यक्ष लुईझ इनाशियो लुला द सिल्व्हा यांचा दूरध्वनी आला.
पंतप्रधानांनी संभाषणादरम्यान गेल्या महिन्यातील त्यांच्या ब्राझील भेटीचे स्मरण केले. या भेटीदरम्यान दोन्ही नेत्यांनी व्यापार, तंत्रज्ञान, उर्जा, संरक्षण, कृषी, आरोग्य आणि दोन्ही देशांतील लोकांच्या दरम्यानच्या संबंधांबाबतचे सहकार्य आणखी बळकट करण्यासाठी आराखडा निश्चित करण्याबाबत सहमती व्यक्त केली होती.
त्यावेळच्या चर्चेच्या आधारे, आज दोन्ही नेत्यांनी भारत-ब्राझील धोरणात्मक भागीदारीला नव्या उंचीवर घेऊन जाण्याप्रती त्यांच्या बांधिलकीचा पुनरुच्चार केला.
दोन्ही नेत्यांनी परस्पर हिताच्या क्षेत्रीय आणि जागतिक मुद्द्यांबाबत विचारांची देवाणघेवाण केली.
या नेत्यांनी परस्परांच्या संपर्कात राहण्याचे मान्य केले.
* * *
निलिमा चितळे/संजना चिटणीस/दर्शना राणे
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai@gmail.com [
0KB ]
/PIBMumbai
/pibmumbai
Had a good conversation with President Lula. Thanked him for making my visit to Brazil memorable and meaningful. We are committed to deepening our Strategic Partnership including in trade, energy, tech, defence, health and more. A strong, people-centric partnership between Global…
— Narendra Modi (@narendramodi) August 7, 2025