Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि ब्रिटनच्या पंतप्रधान यांच्यात दूरध्वनीवरुन संभाषण


ब्रिटनच्या पंतप्रधान थेरेसा मे यांनी आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी दूरध्वनीद्वारे संवाद साधला.

नुकत्याच झालेल्या दिवाळी सणाच्या शुभेच्छा उभय नेत्यांनी परस्परांना दिल्या.
विज्ञान आणि तंत्रज्ञान, व्यापार आणि गुंतवणूक, संरक्षण आणि सुरक्षा यासह इतर क्षेत्रातही द्विपक्षीय सहकार्य अधिक दृढ करायला वाव असल्याचे उभय नेत्यांनी मान्य केले. पुढच्या आठवडयात पंतप्रधान मे यांच्या भारत भेटीदरम्यान त्यांचे स्वागत करायला आपण उत्सूक असल्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितले.

B.Gokhale/N.Chitale/Anagha