Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि नेपाळचे पंतप्रधान के. पी. शर्मा ओली यांच्यात दूरध्वनीवरुन संभाषण


नेपाळचे पंतप्रधान के. पी. शर्मा ओली यांनी आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना दूरध्वनी करुन नेपाळमधल्या राजकीय घडामोडींबाबत माहिती दिली.

नेपाळमधल्या राजकीय समस्यांवर सहमतीने चिरस्वरुपी उपाय शोधण्याच्या महत्वावर पंतप्रधानांनी भर दिला.

नेपाळच्या जनतेला नव वर्ष 2016 साठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुभेच्छाही दिल्या.