Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

पंतप्रधान नरेंद्र मोदी, इस्रायलचे पंतप्रधान नेतान्याहू यांनी ‘आयक्रिएट’चे केले लोकार्पण

पंतप्रधान नरेंद्र मोदी, इस्रायलचे पंतप्रधान नेतान्याहू यांनी ‘आयक्रिएट’चे केले लोकार्पण

पंतप्रधान नरेंद्र मोदी, इस्रायलचे पंतप्रधान नेतान्याहू यांनी ‘आयक्रिएट’चे केले लोकार्पण

पंतप्रधान नरेंद्र मोदी, इस्रायलचे पंतप्रधान नेतान्याहू यांनी ‘आयक्रिएट’चे केले लोकार्पण


पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि इस्रायलचे पंतप्रधान नेत्यान्याहू यांनी अहमदाबाद उपनगरामध्ये सुरू करण्यात आलेल्या ‘आयक्रिएट’ या सुविधेचे आज लोकार्पण केले. नवद्योजकांना निर्मिती, नवकल्पना, अभियांत्रिकी, उत्पादन रचना आणि नवीन तंत्रज्ञानाची माहिती एकाच ठिकाणी मिळण्याची सुविधा ‘आयक्रिएट’मुळे मिळणार आहे. अन्नसुरक्षा, पाणी, दूरसंचार व्यवस्था, सायबर सुरक्षा, माहिती आणि तंत्रज्ञान तसेच इलेक्ट्रॉनिक्स, ऊर्जा, जैव वैद्यकीय साधने आणि यंत्रे यांची निर्मिती ‘आयक्रिएट’च्या माध्यमातून करून भारतात पर्यावरण प्रणाली विकसित करतानाच उच्च गुणवत्ता असलेले नवउद्योजक निर्माण करण्याचा उद्देश आहे.

यावेळी दोन्ही नेत्यांनी वेगवेगळ्या क्षेत्रातल्या विविध तंत्रज्ञानाच्या आणि नवकल्पनांच्या स्टॉल्सना भेटी दिल्या.

भारत आणि इस्रायल या दोन्ही देशातील लोकांना एकमेकांच्या अधिक जवळ आणण्यासाठी नवकल्पना महत्वपूर्ण भूमिका बजावणार आहे, असे मत पंतप्रधानांनी यावेळी मार्गदर्शन करताना व्यक्त केले. तंत्रज्ञान क्षेत्रात इस्रायलनी केलेली भरीव कामगिरी आणि दाखवलेले कौशल्य यांची दखल संपूर्ण जगाने घेतली आहे, असेही पंतप्रधान यावेळी म्हणाले.

भारतीय युवकांमध्ये अमाप ऊर्जा आणि उत्साह आहे. त्यांना आता प्रोत्साहन देण्याबरोबरच संस्थात्मक पातळीवर पाठिंबा देण्याची आवश्यकता आहे, असंही पंतप्रधान यावेळी म्हणाले.

सरकारला संपूर्ण कार्यपद्धतीच नवकल्पनांनीयुक्त असावी असे वाटतेय, असं सांगून पंतप्रधान मोदी यावेळी म्हणाले, वेगवेगळ्या कल्पनांमधूनच नवनवीन कल्पना येतात आणि नवकल्पनांमधूनच नवभारत निर्माण होण्यासाठी मदत मिळणार आहे. यश मिळवायचे असेल तर त्यासाठी आधी धाडस दाखवण्याची आवश्यकता आहे, असे सांगून पंतप्रधानांनी ‘आयक्रिएट’मध्ये सहभागी होण्याचे धाडस दाखवणाऱ्या युवकांचे अभिनंदन केले.

रुढी, परंपरा आणि नवकल्पना यांच्यातील कोंडी फोडण्यासाठी काय केले पाहिजे हे सांगताना पंतप्रधानांनी कालिदासाच्या श्लोकाचे उदाहरण दिले आणि भारतीय युवकांनी देशाला आज भेडसावत असणाऱ्या प्रश्नांना, आव्हानांना तोंड देण्यासाठी नवउद्योजक म्हणून पुढे यावे. सर्वसामान्य जनतेच्या राहणीमानात सुधारणा घडवून आणण्यासाठी कमीत कमी खर्चात सर्वतोपरी प्रयत्न करण्याचे आवाहन केले.

अन्नधान्य, पाणी, आरोग्य आणि ऊर्जा क्षेत्रात भारत आणि इस्रायल यांच्यात सहकार्य करण्यात येणार असल्याचे पंतप्रधानांनी यावेळी सांगितले. या उभय देशांमध्ये होत असलेले सहकार्य म्हणजे 21 व्या शतकातील मानवजातीच्या इतिहासातील नव्या अध्याय आहे, असेही पंतप्रधान मोदी यावेळी म्हणाले.

B.Gokhale/S.Bedekar/P.Kor