Search

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तामिळनाडूतील करूर इथे एका राजकीय रॅलीदरम्यान झालेल्या दुर्दैवी घटनेतील जीवितहानीबद्दल व्यक्त केला शोक


नवी दिल्‍ली, 28 सप्‍टेंबर 2025

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तामिळनाडूतील करूर इथे एका राजकीय रॅलीदरम्यान झालेल्या दुर्दैवी घटनेतील जीवितहानीबद्दल शोक व्यक्त केला.  देश या घटनेतील पिडीत कुटुंबियांसोबत एकजुटीने उभा आहे, तसेच त्यांना आवश्यक पाठबळ आणि मदत मिळेल हे सुनिश्चित करण्यासाठी सरकार वचनबद्ध असल्याचे त्यांनी म्हटले आहे.

यासंदर्भात पंतप्रधानांनी एक्स या समाज माध्यमावर स्वतंत्रपणे लिहिलेला संदेश:

“तामिळनाडूतील करूर इथे एका राजकीय रॅलीदरम्यान झालेली दुर्दैवी घटना अत्यंत दुःखदायक आहे. ज्यांनी आपल्या प्रियजनांना गमावले आहे, त्या कुटुंबियांच्या दुःखात मी सहभागी आहे. या कठीण प्रसंगी त्यांना ताकद मिळो, ही प्रार्थना. सर्व जखमी लवकरात लवकर बरे व्हावेत यासाठी मी प्रार्थना करतो.”

* * *

नेहा कुलकर्णी/तुषार पवार/दर्शना राणे