Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी मॉरिशसच्या पंतप्रधानांनी दूरध्वनीवरून केली चर्चा


नवी दिल्ली, 9 फेब्रुवारी 2026

पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मॉरिशसचे पंतप्रधान डॉ. नवीनचंद्र रामगुलाम यांनी आज दूरध्वनीवरून चर्चा केली.

दोन्ही नेत्यांनी सप्टेंबर 2025 मध्ये वाराणसी येथे झालेल्या त्यांच्या आधीच्या बैठकीनंतरच्या व्यापक द्विपक्षीय सहकार्याचा आढावा घेतला, यामध्ये विकासात्मक भागीदारी, क्षमता निर्माण आणि नागरिकांमधील आदानप्रदान इत्यादी विषयांवर चर्चा झाली.

दोन्ही नेत्यांनी दोन्ही राष्ट्रांमधील नागरिकांच्या हितासाठी भारत-मॉरिशस यांच्यातील वाढत्या धोरणात्मक भागीदारीला वृद्धिंगत करण्याच्या सामायिक वचनबद्धतेचा पुनरुच्चार केला.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारताच्या महासागर अर्थात सर्व क्षेत्रांमध्ये सुरक्षा आणि वाढीसाठी परस्पर आणि सर्वांगीण प्रगती, भारताचे  शेजारी प्रथम हे धोरण आणि ग्लोबल साऊथ संदर्भातील सामायिक वचनबद्धतेनुसार, मॉरिशसच्या विकासाच्या प्राधान्यक्रमांना भारताचा सतत पाठिंबा राहील, हे पुन्हा एकदा अधोरेखित केले.

दोन्ही नेत्यांनी हिंद महासागर क्षेत्रात शांतता आणि स्थैर्य प्रस्थापित करण्यासाठी एकत्र काम करण्याबाबत सहमती दर्शवली.

पुढील आठवड्यात नवी दिल्लीत होणाऱ्या कृत्रिम बुद्धिमत्ता शिखर परिषदेसाठी त्यांचे  स्वागत करायला उत्सुक असल्याचे पंतप्रधानांनी सांगितले. 

सुषमा काणे/भक्ती सोनटक्के/प्रिती मालंडकर

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:PM India@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai   PM India /pibmumbai  PM Indiapibmumbai[at]gmail[dot]com  PM India/PIBMumbai   PM India /pibmumbai