Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नि:स्वार्थ सेवा आणि करुणा भाव अधोरेखित करणारे संस्कृत सुभाषित सामायिक केले


नि:स्वार्थ भावनेने केलेले काम, हेच मानवतेचे खरे रूप आहे, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटले आहे. अशा कामांमुळे केवळ आंतरिक आनंदच लाभत नाही, तर समाजाच्या कल्याणालाही हातभार लागतो, असे त्यांनी नमूद केले.

पंतप्रधानांनी संस्कृत सुभाषित सामायिक केले आहे-

“अद्रोहः सर्वभूतेषु कर्मणा मनसा गिरा।
अनुग्रहश्च दानं च शीलमेतत्प्रशस्यते॥”

कोणत्याही जीवाविषयी द्वेष भाव  न बाळगणे, मग ते विचाराने असो, शब्दाने असो, की कृतीने असो. सर्वांशी करुणेने वागणे आणि उदारपणे देत राहणे, हेच आचरणाचे सर्वोच्च स्वरूप मानले जाते, असा संदेश हे सुभाषित देते.

पंतप्रधानांनी एक्स वर लिहिले आहे:

“नि:स्वार्थ भावनेने केलेले कामच खरी मानवता आहे. यामुळे आत्मिक आनंद तर मिळतोच, पान समाजाचे कल्याणही होते.

अद्रोहः सर्वभूतेषु कर्मणा मनसा गिरा।

अनुग्रहश्च दानं च शीलमेतत्प्रशस्यते॥”

***

NehaKulkarni / RajashreeAgashe / DineshYadav

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:PM India@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai   PM India /pibmumbai  PM Indiapibmumbai[at]gmail[dot]com  PM India/PIBMumbai   PM India /pibmumbai