Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या आगामी सोमनाथ भेटीवर एक संपादकीय लेख लिहिला


नवी दिल्‍ली, 8 मे 2026

 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या 11 मे रोजीच्या आगामी सोमनाथ भेटीवर एक संपादकीय लेख लिहिला असून सोमनाथचे चिरंतर महात्म्य आणि भारतीय संस्कृतीच्या समृद्धतेला अधोरेखित केले आहे.

या संपादकीय लेखाबद्दल एक्स या समाजमाध्यमावरील पोस्ट मध्ये माहिती सामायिक करताना पंतप्रधानांनी सोमनाथ मंदिराचे रक्षण करण्यासाठी आणि त्याचे वैभव पुनर्संचयित करण्यासाठी अनेक आव्हानांना तोंड देऊनही दृढ राहिलेल्या सर्वांना आदरांजली वाहिली आहे. 

पंतप्रधानांनी एक्स समाजमाध्यमावरील पोस्ट मध्ये लिहिले आहे:

“येत्या 11 मे रोजीच्या माझ्या आगामी सोमनाथ भेटीबद्दल तसेच सोमनाथबद्दलचा आदरभाव आणि आपल्या संस्कृतीचे महात्म्य या दृष्टीने हा दिवस कायमच अतिशय महत्त्वपूर्ण का राहिला आहे, याविषयी एक संपादकीय लेख लिहिला आहे. तसेच अशा प्रत्येक व्यक्तीला, ज्यांनी कित्येक आव्हानांचा सामना करुन सोमनाथचे रक्षण केले आणि त्याचे वैभव कायम राखले, अशा प्रत्येकाला मी आदरांजली वाहिली. 

https://www.narendramodi.in/somnath-and-bharat-s-unconquerable-spirit

 

“नूतनीकरण केलेल्या सोमनाथ मंदिराच्या लोकार्पणाच्या 75 व्या वर्धापन दिनानिमित्त 11 मे रोजी मला  पुन्हा एकदा तिथे भेट देण्याचे सौभाग्य लाभत आहे. या पवित्रस्थानाचे रक्षण आणि त्याच्या पुनर्निमितीसाठी देशातील कित्येक पिढ्यांनी कशाप्रकारे निरंतर संघर्ष केला आहे, याचे स्मरण करण्याची संधी देखील या क्षणामुळे मिळाली आहे. माझ्या देशबांधवांना लिहिलेल्या या पत्रात, मी भव्य आणि दिव्य सोमनाथ धामाला समर्पित माझ्या भावना व्यक्त केल्या आहेत.”

https://www.narendramodi.in/hi/somnath-and-bharat-s-unconquerable-spirit

 

* * *

नेहा कुलकर्णी/भक्‍ती सोनटक्‍के/दर्शना राणे

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:PM India

@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai   PM India /pibmumbai  PM Indiapibmumbai@gmail.com [ PM India 0KB ]   PM India/PIBMumbai   PM India /pibmumbai