Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारतीय सशस्त्र दलांचे शौर्य आणि कर्तव्य अधोरेखित करणारे संस्कृत सुभाषित केले सामायिक


नवी दिल्‍ली, 8 मे 2026

 

राष्ट्राचा सन्मान आणि प्रतिष्ठेचे रक्षण करण्यासाठी भारतीय सशस्त्र दलांनी दाखवलेले धैर्य आणि शौर्य प्रत्येक भारतीयाला अभिमान वाटायला लावणारे आहे, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले. भारतमातेसाठी सर्वस्व त्याग करण्याची त्यांची भावना सर्वांसाठी प्रेरणास्रोत आहे, असेही ते म्हणाले.

पंतप्रधानांनी एक संस्कृत श्लोक सामायिक केला-

“स्वधर्ममपि चावेक्ष्य न विकम्पितुमर्हसि |

धर्म्याद्धि युद्धाच्छ्रेयोऽन्यत्क्षत्रियस्य न विद्यते ||”

या श्लोकाचा अर्थ असा आहे – जेव्हा एखाद्याला आपल्या कर्तव्याची जाणीव होते, तेव्हा मनात कोणत्याही प्रकारचा संकोच किंवा भीती नसावी, कारण न्यायाच्या वेदीवर धर्म आणि सन्मानाचे रक्षण करण्यासाठी केलेला संघर्ष हा योद्ध्यासाठी आत्मकल्याणाचा सर्वात उत्कृष्ट आणि सर्वात गौरवशाली मार्ग आहे.

 

* * *

नेहा कुलकर्णी/श्रद्धा मुखेडकर/दर्शना राणे

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:PM India@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai   PM India /pibmumbai  PM Indiapibmumbai@gmail.com  PM India/PIBMumbai   PM India /pibmumbai