पीएम्इंडिया
नवी दिल्ली, 11 मे 2026
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज सोमनाथ मंदिराला भेट दिली. या मंदिराच्या पुनर्बांधणीनंतर, भाविकांसाठी मंदिराचे दरवाजे खुले झाल्याच्या घटनेला 75 वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त, परमेश्वराचे आशीर्वाद मिळाल्याची भावना पंतप्रधानांनी व्यक्त केली आहे.
सोमनाथ मंदिर पुनर्बांधणीनंतरच्या लोकार्पणाच्या अमृत महोत्सवात, या मंदिरात आल्यावर मिळालेल्या दिव्य अनुभूतीचे पंतप्रधानांनी वर्णन केले आहे. या मंदिरात श्री सोमनाथाच्या दर्शनासाठी येणाऱ्या सर्व भाविकांमध्ये असलेला उत्साह आणि ऊर्जा बघून आपण भावनिक आणि सद्गदित झाल्याचे पंतप्रधानांनी अधोरेखित केले आहे. भारताचे पहिले राष्ट्रपती डॉ. राजेंद्र प्रसाद यांच्या हस्ते मंदिराचे उद्घाटन झाले, त्यावेळी, त्यांच्या भावना काय असतील, याचा क्षण आपण प्रत्यक्ष अनुभवल्याचे पंतप्रधानांनी म्हटले आहे.सोमनाथ अमृत महोत्सवाचे भक्तिमय वातावरण संपूर्ण भवतालात एक अद्वितीय ऊर्जा निर्माण करत असल्याचेही पंतप्रधानांनी म्हटले आहे.
सोमनाथच्या प्रत्येक कानाकोपऱ्यात ह्या भक्तीची अनुभूती येत असल्याची भावनाही मोदी यांनी व्यक्त केली आहे. मंदिराच्या पुनर्बांधणी आणि दर्शनासाठी दारे उघडल्याच्या घटनेच्या या अमृत महोत्सवानिमित्त, लक्षावधी भाविक इथे जमले असल्याचे, त्यांनी नमूद केले आहे. हा ऐतिहासिक दिवस, भारताच्या सांस्कृतिक प्रवासातील एक मैलाचा टप्पा होता, असेही त्यांनी अधोरेखित केले आहे.
एक्स या समाजमध्यावर, आपल्या पोस्टच्या मालिकेत त्यांनी म्हटलं आहे:
“जय सोमनाथ! ह्या मंदिराच्या पुनर्बांधणीला 75 वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने इथे येणं, परमेश्वराचा साक्षात आशीर्वाद आहे.”
Jai Somnath! Feeling blessed to be here, when we are marking 75 years since the rebuilt Temple opened its doors for devotees. pic.twitter.com/gFumT80Qva
— Narendra Modi (@narendramodi) May 11, 2026
“पुनर्निर्मित सोमनाथ मंदिर के लोकार्पण की 75वीं वर्षगांठ पर पावनधाम सोमनाथ आकर दिव्य अनुभूति हुई है। इस अवसर पर मंदिर मार्ग पर भगवान सोमनाथ के भक्तों के जोश और प्रचंड उत्साह को देखकर मन अभिभूत और भावविभोर है! मैं आज यहां उस क्षण को जी रहा हूं, जिसका अनुभव भारत के प्रथम राष्ट्रपति डॉ. राजेंद्र प्रसाद जी ने पुनर्निर्मित मंदिर के लोकार्पण के अवसर पर किया होगा। सोमनाथ अमृत महोत्सव का भक्तिमय वातावरण हर तरफ अद्भुत ऊर्जा का संचार कर रहा है।
पुनर्निर्मित सोमनाथ मंदिर के लोकार्पण की 75वीं वर्षगांठ पर पावनधाम सोमनाथ आकर दिव्य अनुभूति हुई है। इस अवसर पर मंदिर मार्ग पर भगवान सोमनाथ के भक्तों के जोश और प्रचंड उत्साह को देखकर मन अभिभूत और भावविभोर है! मैं आज यहां उस क्षण को जी रहा हूं, जिसका अनुभव भारत के प्रथम राष्ट्रपति… pic.twitter.com/nzzOk94BQJ
— Narendra Modi (@narendramodi) May 11, 2026
सोमनाथ मंदिर पुनर्बांधणीनंतरच्या लोकार्पण सोहळ्याच्या अमृत महोत्सवात, या मंदिरात आल्यावर दिव्य अनुभूती जाणवली. या मंदिरात श्री सोमनाथाच्या दर्शनासाठी येणाऱ्या सर्व भाविकांमध्ये असलेला उत्साह आणि ऊर्जा भावनिक आणि सद्गदित झालो आहे. भारताचे पहिले राष्ट्रपती डॉ.राजेंद्र प्रसाद यांच्या हस्ते मंदिराचे लोकार्पण झाले, त्यावेळी, त्यांच्या भावना काय असतील, याचा क्षण आज मी प्रत्यक्ष अनुभवतो आहे. हा ऐतिहासिक दिवस, भारताच्या सांस्कृतिक प्रवासातील एक मैलाचा टप्पा ठरणार आहे.
At Somnath, one can experience Bhakti in every corner. Countless people have come together to mark 75 years since the rebuilt Temple opened its doors to devotees. That day was indeed a milestone in the civilisational journey of Bharat. pic.twitter.com/wvNbmAN5V8
— Narendra Modi (@narendramodi) May 11, 2026
नेहा कुलकर्णी/राधिका अघोर/प्रिती मालंडकर
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com