पीएम्इंडिया
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज नेदरलँड्सच्या हेग इथे, भारतीय समुदायाने आयोजित केलेल्या स्वागत समारंभाला उपस्थित होते. ते तिथे पोहोचल्यावर, मोठ्या संख्येने उपस्थित असलेल्या भारतीय समुदायाने आणि नेदरलँड्समधील भारताच्या मित्रांनी, त्यांचे अत्यंत उत्साहात स्वागत केले.
यावेळी उपस्थितांना संबोधित करतांना, पंतप्रधानांनी या उत्साही आणि रंगतदार स्वागत समारंभाचे कौतुक केले. डच समाजासाठी दिलेल्या योगदानाबद्दल, तसेच भारत आणि नेदरलँड्स यांच्यातील मैत्रीचा एक जिवंत दुवा म्हणून कार्य केल्याबद्दल त्यांनी अनिवासी भारतीयांची प्रशंसा केली. सुरीनामी- हिंदुस्थानी समुदायाच्या भारताशी असलेल्या प्राचीन नातेसंबंधांचेही त्यांनी स्मरण केले. पिढ्यानपिढ्या हे संबंध जतन करत, त्यांचा उत्सव साजरा करणाऱ्या लोकांच्या प्रयत्नांचेही त्यांनी कौतुक केले. नेदरलँड्समध्ये, तंत्रज्ञान क्षेत्रात भारतीय व्यावसायिकांची संख्या मोठी असून, डच विद्यापीठातही, विशेषतः नवोन्मेष प्रणित क्षेत्रात, भारतीय विद्यार्थ्यांची संख्या वाढत असल्याचे सांगत, ते दोन देशात आताही भागीदारी वृद्धिंगत करण्यात भर घालत आहे, अशी भावना त्यांनी व्यक्त केली. क्रिकेट आणि हॉकी सारख्या खेळांसह, इतर क्रीडाक्षेत्रात दोन्ही देशात नवे चैतन्य आणि लोकांचा परस्पर संबंध वाढतो आहे, हे ही त्यांनी अधोरेखित केले.
भारत आणि नेदरलँड्स यांच्यातील द्विपक्षीय सहकार्य सातत्याने विस्तारत असून, तंत्रज्ञान आणि नवोन्मेष ही त्यातील प्रमुख लक्षवेधी क्षेत्रे असल्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अधोरेखित केले.
दोन्ही देशांमधील मजबूत आणि वाढत्या व्यापार आणि आर्थिक संबंधांवर त्यांनी भर दिला. नेदरलँड्स हा युरोपमधील भारताच्या सर्वात मोठ्या निर्यात देशांपैकी एक असून, भारतातील प्रमुख गुंतवणूक भागीदारांपैकीही एक असल्याचे त्यांनी नमूद केले. तसेच, भारत-युरोपीय महासंघ यांच्यातील मुक्त व्यापार करारामुळे दोन्ही बाजूंना नव्या संधी उपलब्ध होतील, असेही त्यांनी सांगितले.
2047 पर्यंत विकसित भारताची उभारणी करण्याच्या उद्दिष्टाच्या दिशेने भारतात होत असलेला विकास आणि वाढ, याची पंतप्राधानांनी माहिती दिली. पायाभूत सुविधा, उत्पादन क्षेत्र, स्वच्छ ऊर्जा आणि डिजिटल प्रणाली यांसह विविध क्षेत्रांमध्ये होत असलेल्या व्यापक प्रगतीमुळे भारतात सुरू असलेल्या परिवर्तनाचा व्यापक आवाका आणि वेग त्यांनी अधोरेखित केला.
भारत आत्मविश्वासाने स्वतःचे भविष्य घडवत असून, त्याचवेळी जागतिक विकास आणि समृद्धीतही महत्त्वपूर्ण योगदान देत असल्याचे त्यांनी नमूद केले.
भारताबाहेर राहणाऱ्या प्रत्येक भारतीय नागारिकाच्या पाठीशी भारत सरकार ठामपणे उभे असून त्यांच्या कल्याणासाठी आपण कटिबद्ध असल्याचे पंतप्रधान म्हणाले. नेदरलँड्समधल्या आपल्या अनुभवांचा उपयोग करत, विकसित भारताच्या उभारणीत योगदान द्यावे, असे आवाहन त्यांनी केले.
नेदरलँड्स ही मुख्य भूमी युरोपमधील सर्वाधिक भारतीय वंशाच्या लोकांचे निवासस्थान असून, त्यामध्ये सुमारे दोन लाख सदस्य सुरिनामी-हिंदुस्थानी आहेत.
सुरिनामी-हिंदुस्थानी अनिवासी भारतीयांसाठी ओ सी आय पात्रतेचे निकष शिथिल करण्यात आले असल्याचे पंतप्रधानांनी सांगितले. यानुसार, त्यांच्यासाठी ओसीआय कार्ड पात्रता चौथ्या पिढीपासून वाढवून सहाव्या पिढीपर्यंत करण्यात आली आहे.
पंतप्रधानांचे संपूर्ण भाषण येथे पाहता येईल: [Link].
***
माधुरी पांगे/राधिका अघोर/परशुराम कोर
***
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai@gmail.com
/PIBMumbai
/pibmumbai
Delighted to interact with the Indian community in The Hague. Their warmth, achievements and strong bond with India continue to make us proud. https://t.co/DVKQo1pKXw
— Narendra Modi (@narendramodi) May 16, 2026
मानवता का इतिहास साक्षी है कि समय के साथ अनेक संस्कृतियां मिट गईं।
— PMO India (@PMOIndia) May 16, 2026
लेकिन भारत का diverse culture, आज भी अपने लोगों के दिलों में धड़कता है: PM @narendramodi
13 वर्ष मुख्यमंत्री के रूप में... 12 वर्ष प्रधानमंत्री का सेवाकाल... Democratic World में 25 वर्षों तक... करोड़ों-करोड़ वोटर्स का लगातार समर्थन... ये मेरे लिए बहुत ही बड़े सौभाग्य की बात है।
— PMO India (@PMOIndia) May 16, 2026
मेरे लिए ये सिर्फ एक आंकड़ा नहीं है... ये मेरी बहुत बड़ी पूंजी है: PM @narendramodi
जब भारत में Aspirations Unlimited हैं, तो Efforts भी Limitless हो रहे हैं: PM @narendramodi
— PMO India (@PMOIndia) May 16, 2026
भारत chip making में, semiconductor sector में भी बड़े कदम उठा रहा है।
— PMO India (@PMOIndia) May 16, 2026
अभी भारत में 12 semiconductor plants पर काम चल रहा है। इनमें से दो plants में production भी शुरु हो चुका है।
यानि अब chip भी, designed in India, made in India होगी: PM @narendramodi
भारत की aspiration driven journey, हमारी democracy को सशक्त कर रही है: PM @narendramodi
— PMO India (@PMOIndia) May 16, 2026
भारत... अपने हर citizen की democratic participation को value करता है।
— PMO India (@PMOIndia) May 16, 2026
और mother of democracy के रूप में, ये हम सभी के लिए बहुत गर्व की बात है: PM @narendramodi
The Indian community in the Netherlands serves as a vibrant bridge between our two nations. It is truly heartening to see how India’s diverse culture continues to thrive in its hearts. pic.twitter.com/Q3tOsjhvWY
— Narendra Modi (@narendramodi) May 16, 2026
The affection and blessings I have received from people across the country inspire me to work harder to fulfil their dreams. pic.twitter.com/czczzBhUA4
— Narendra Modi (@narendramodi) May 16, 2026
Today, India’s aspirations are unlimited and the scale of our efforts is equally immense! pic.twitter.com/mfgQZhPho8
— Narendra Modi (@narendramodi) May 16, 2026
Today’s India is powered by innovation and is witnessing an unprecedented transformation across every sector. pic.twitter.com/Zt3oIZmPWn
— Narendra Modi (@narendramodi) May 16, 2026
Amidst the many global challenges of today, India and the Netherlands are working together to build future-ready supply chains. From energy security to water security, both countries are cooperating closely. pic.twitter.com/ftlseESm5b
— Narendra Modi (@narendramodi) May 16, 2026
The tulip and the lotus remind us that whether roots lie in water or in the soil, with the right nourishment, they blossom. This is also the foundation of the partnership between India and the Netherlands. pic.twitter.com/o8Ghs6kT9S
— Narendra Modi (@narendramodi) May 16, 2026
Deeply touched by the immense enthusiasm and affection of the Indian community at the community programme in The Hague. Their energy and connection with India are deeply special. pic.twitter.com/qGyHuUDtSc
— Narendra Modi (@narendramodi) May 16, 2026