पीएम्इंडिया
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज नेदरलँड्सचे पंतप्रधान महामहीम रॉब जेटन यांच्यासोबत डच पंतप्रधानांच्या द हेग इथल्या अधिकृत निवासस्थानी (कॅटशुईस) अधिकृत चर्चा केली.
दोन्ही पंतप्रधानांनी भारत आणि नेदरलँड्समधील संबंधांना बळकटी देण्यावर व्यापक चर्चा केली. दोन्ही देशांमधील परस्पर सामायिक मूल्ये आणि विश्वास, तसेच वाढता समन्वय आणि वाढत्या सहकार्याची दखल घेत, द्विपक्षीय संबंधांना धोरणात्मक भागीदारी पातळीवर नेण्याचा निर्णय दोन्ही नेत्यांनी घेतला. व्यापार आणि गुंतवणूक, संरक्षण आणि सुरक्षा, उदयोन्मुख आणि महत्त्वपूर्ण तंत्रज्ञान, सागरी क्षेत्र, नूतनीकरणक्षम ऊर्जा आणि शिक्षण या क्षेत्रांमधील सहकार्य अधिक दृढ करण्यासाठी धोरणात्मक भागीदारीसाठीचा एक महत्त्वाकांक्षी मार्गदर्शक आराखडा आखण्यावरही त्यांनी सहमती व्यक्त केली. दोन्ही देशांमधील विस्तारत असलेले व्यवसाय, गुंतवणूक, तंत्रज्ञान आणि नवोन्मेष विषयक भागीदारी या बाबींची दखल त्यांनी घेतली. भारताच्या विकासगाथेमुळे उपलब्ध होत असलेल्या संधींमुळे डच कंपन्यांना व्यवसायाच्या आश्वासक शक्यता उपलब्ध होत असल्याचेही दोन्ही नेत्यांनी नमूद केले.
उच्च स्तरीय पातळीवरील सातत्यपूर्ण देवाणघेवाणीमुळे द्विपक्षीय सहकार्यात झालेल्या प्रगतीबद्दल दोन्ही नेत्यांनी समाधान व्यक्त केले. जल, कृषी आणि आरोग्य (WAH – Water, Agriculture and Health) या क्षेत्रांमधील सहकार्याचे महत्त्वही त्यांनी अधोरेखित केले. जल प्रकल्पांच्या बाबतीततल्या मोठ्या व्यापक सहकार्याच्या माध्यमातून जल क्षेत्राअंतर्गतची धोरणात्मक भागीदारी अधिक दृढ करण्यावर दोन्ही नेत्यांनी सहमती व्यक्त केली. आरोग्य सेवा संशोधन, डिजिटल आरोग्यसेवा, कृषी आणि अन्न सुरक्षा अशा प्रमुख क्षेत्रांमधील विस्तारत्या सहकार्याचे पंतप्रधानांनी स्वागतही केले.
दोन्ही देशांमधील व्यापार आणि गुंतवणूक विषयक संबंधांची व्याप्ती विस्तारण्यावर दोन्ही नेत्यांनी विशेष भर दिला. भारत आणि युरोपीय महासंघातील मुक्त व्यापार कराराच्या परिवर्तनकारी क्षमतेचा दखलपूर्ण उल्लेख त्यांनी केला, या पार्श्वभूमीवर या करारावर लवकरात लवकर स्वाक्षरी करून तो अंमलात आणण्याचे आवाहन त्यांनी केले. महत्वपूर्ण खनिजांच्या क्षेत्रातील भारत आणि नेदरलँड्समधील सहकार्यामुळे लवचिक पुरवठा साखळीला मोठे पाठबळ मिळेल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
कृत्रिम बुद्धिमत्ता आणि सेमीकंडक्टर यांसारख्या उदयोन्मुख तंत्रज्ञानाच्या क्षेत्रातील सहकार्य वाढवण्याची गरजही दोन्ही नेत्यांनी व्यक्त केली. दोन्ही देशांमधील युवा वर्गाचा सहभाग असलेल्या हॅकाथॉनच्या आयोजनालाही त्यांनी प्रोत्साहन दिले. नूतनीकरणक्षम ऊर्जा क्षेत्रातील सहकार्याला बळकटी देण्याची वचनबद्धता त्यांनी व्यक्त केली. शाश्वत भविष्याची सुनिश्चिती करण्यासाठी हरित हायड्रोजन, जैवइंधने, हरित सागरी मालवाहतूक आणि सागरी रसद पुरवठा व्यवस्थापन क्षेत्रांमधील सहकार्याचे महत्त्वही त्यांनी अधोरेखित केले. दळणवळण क्षेत्रातील भागीदारी आणि उच्च शिक्षण क्षेत्रातील परस्पर सहकार्य अधिक बळकट करण्यासाठी हाती घेतलेल्या नवीन उपक्रमांना आपले पाठबळ असल्याचे दोन्ही पंतप्रधानांनी सांगितले. या संदर्भात, नालंदा विद्यापीठ आणि ग्रोनिंगेन विद्यापीठ यांच्यात झालेल्या कराराचा विशेष उल्लेख त्यांनी केला.
दोन्ही देशांमधील दृढ सांस्कृतिक संबंधांचा उल्लेख त्यांनी केला. 11 व्या शतकातील चोल राजवंशाचे ताम्रपट परत मिळवून देण्याच्या प्रक्रियेत सहकार्य केल्याबद्दल पंतप्रधान मोदी यांनी डच सरकारचे आभार मानले. या अनुषंगाने, लायडन विद्यापीठ ग्रंथालय आणि भारतीय पुरातत्व सर्वेक्षण विभागामधील सहकार्याचेही दोन्ही नेत्यांनी स्वागत केले. या भागिदारीमुळे ऐतिहासिक कलाकृतींसंबंधीचे ज्ञान अधिक समृद्ध करण्यात मदत होणार असल्याची बाब दोन्ही नेत्यांनी नमूद केली.
या अधिकृत चर्चेनंतर दोन्ही देशांमध्ये तंत्रज्ञान, हरित ऊर्जा, व्यापार, दळणवळण, जल, कृषी आणि आरोग्य, शिक्षण आणि संस्कृती या क्षेत्रांशी संबंधित 14 करार आणि सामंजस्य करारांवर स्वाक्षऱ्या करण्यात आल्या. या दौऱ्याच्या निमित्ताने दोन्ही देशांनी एक संयुक्त निवेदन आणि धोरणात्मक भागीदारीचा मार्गदर्शक आराखड्यालाही स्विकृती दिली.
पंतप्रधान मोदी यांनी नेदरलँड्सचे पंतप्रधान जेटन यांना भारत भेटीचे आमंत्रणही दिले, पंतप्रधान जेटन यांनी हे आमंत्रण स्वीकारले.
भारत आणि नेदरलँड्समध्ये परस्पर सामायिक लोकशाही मूल्ये आणि विविध क्षेत्रांमधील बहुआयामी सहकार्यावर आधारित मजबूत द्विपक्षीय संबंध आहेत. पंतप्रधान मोदी यांची ही नेदरलँड्स भेट या भागीदारीतील एक महत्त्वाचा ऐतिहासिक टप्पा ठरली आहे.
***
आशिष सांगळे / तुषार पवार/परशुराम कोर
***
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai@gmail.com
/PIBMumbai
/pibmumbai
Thank you, Prime Minister Rob Jetten. I am happy to be here in the Netherlands with the aim of further cementing our bilateral cooperation. Over the past decade, the India-Netherlands partnership has made remarkable progress. And, now is the time to do even more so that the… https://t.co/eCm5ZzQf3v
— Narendra Modi (@narendramodi) May 16, 2026
My talks with Prime Minister Rob Jetten were extensive, covering a wide range of topics. One such area is defence and security-related. I spoke about the possibility of defence industrial roadmap at the earliest. We can also work together in sectors such as space, marine systems… pic.twitter.com/sMgKLOdmL8
— Narendra Modi (@narendramodi) May 16, 2026
Economic cooperation is a key pillar of the India-Netherlands friendship. The India-EU FTA offers infinite possibilities. There is immense scope to work together in fintech, critical minerals, semiconductors, green hydrogen and AI. We also discussed ways to enhance cultural… pic.twitter.com/AEskHlVIgz
— Narendra Modi (@narendramodi) May 16, 2026
Dank u wel, premier Rob Jetten.
— Narendra Modi (@narendramodi) May 16, 2026
Ik ben blij hier in Nederland te zijn met als doel onze bilaterale samenwerking verder te versterken. De afgelopen tien jaar heeft het partnerschap tussen India en Nederland ongelooflijke vooruitgang geboekt. En nu is het tijd om daar nog meer… https://t.co/eCm5ZzQf3v
Mijn gesprekken met premier Rob Jetten waren uitgebreid en bestreken een breed scala aan onderwerpen. Een daarvan was defensie en veiligheid. Ik sprak over de mogelijkheid om zo snel mogelijk een stappenplan voor de defensie-industrie op te stellen. We kunnen ook samenwerken in… pic.twitter.com/hwgrBZzCsC
— Narendra Modi (@narendramodi) May 16, 2026
Economische samenwerking is een belangrijke pijler van de vriendschap tussen India en Nederland. De vrijhandelsovereenkomst tussen India en de EU biedt oneindige mogelijkheden. Er is enorm veel ruimte voor samenwerking op het gebied van fintech, kritieke mineralen, halfgeleiders,… pic.twitter.com/IQxBFrdClL
— Narendra Modi (@narendramodi) May 16, 2026
PM @narendramodi held productive talks with PM Rob Jetten covering a wide range of subjects. The discussions focused on strengthening cooperation in maritime security, space and marine systems, including the possibility of an early defence industrial roadmap.
— PMO India (@PMOIndia) May 16, 2026
The two leaders… pic.twitter.com/GbjKTD5LAt