Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विविध लोकांना आपल्या कुटुंबातील सदस्य मानणाऱ्या पृथ्वीमातेच्या वात्सल्याचे वर्णन करणारे संस्कृत सुभाषित केले सामायिक


पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज एक संस्कृत सुभाषित सामायिक केले असून यामध्ये पृथ्वी माता संपूर्ण मानवतेला आपले कुटुंब मानत असल्याचे वर्णन केले आहे. पृथ्वीसाठी हे संपूर्ण विश्वच घरासमान आहे, जिथे प्रत्येक संस्कृतीला स्वतःचे महत्त्व आणि सन्मान आहे.

पंतप्रधानांनी ‘एक्स’ वरील पोस्ट मध्ये लिहिले आहे:

धरणीमाता संपूर्ण मानवजातीला एक कुटुंब मानते. तिच्यासाठी संपूर्ण जग एका घरासारखे आहे, जिथे प्रत्येक संस्कृतीला स्वतःचे महत्त्व आणि आदर आहे.

जनं बिभ्रती बहुधा विवाचसं नानाधर्माणं पृथिवी यथौकसम्।

सहस्रं धारा द्रविणस्य मे दुहां ध्रुवेव धेनुरनपस्फुरन्ती ॥”

धरणीमाता वेगवेगळ्या भाषा बोलणाऱ्या आणि विविध धर्मांचे आणि परंपरांचे पालन करणाऱ्या लोकांना आपल्या घरातील सदस्य मानते. ज्याप्रमाणे एखादी शांत आणि प्रेमळ गोमाता आपल्याला दूध देते त्याप्रमाणे ही धरतीमाता आपल्यावर हजारो धारांनी सुखसमृद्धीचा वर्षाव करु देत.

*** 

NitinFulluke / BhaktiSontakke / DineshYadav

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:PM India@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai   PM India /pibmumbai  PM Indiapibmumbai[at]gmail[dot]com  PM India/PIBMumbai   PM India /pibmumbai