Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते जिगानी, बेंगळुरु इथे “योग संशोधन आणि त्याचा उपयोग याबाबतची नवी क्षितिज” या आंतरराष्ट्रीय परिषदेचं उद्घाटन

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते जिगानी, बेंगळुरु इथे “योग संशोधन आणि त्याचा उपयोग याबाबतची नवी क्षितिज” या आंतरराष्ट्रीय परिषदेचं उद्घाटन

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते जिगानी, बेंगळुरु इथे “योग संशोधन आणि त्याचा उपयोग याबाबतची नवी क्षितिज” या आंतरराष्ट्रीय परिषदेचं उद्घाटन

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते जिगानी, बेंगळुरु इथे “योग संशोधन आणि त्याचा उपयोग याबाबतची नवी क्षितिज” या आंतरराष्ट्रीय परिषदेचं उद्घाटन

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते जिगानी, बेंगळुरु इथे “योग संशोधन आणि त्याचा उपयोग याबाबतची नवी क्षितिज” या आंतरराष्ट्रीय परिषदेचं उद्घाटन

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते जिगानी, बेंगळुरु इथे “योग संशोधन आणि त्याचा उपयोग याबाबतची नवी क्षितिज” या आंतरराष्ट्रीय परिषदेचं उद्घाटन


पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज जिगानी, बेंगळुरु इथं “योग संशोधन आणि त्याचा उपयोग याबाबतची नवी क्षितिज” या आंतरराष्ट्रीय परिषदेचे उद्‌घाटन केले.

पंतप्रधानांनी एकात्मिक औषध विषयक रुग्णालयाच्या कोनशिलेचे अनावरण केले.

पंतप्रधानांचे उद्‌घाटनपर भाषण पुढीलप्रमाणे –

कर्नाटकचे राज्यपाल वजुभाई वाला,

कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या,

मंत्रिमंडळातील माझे आदरणीय सहकारी

डॉ. नागेंद्र

व्यासपीठावर उपस्थित मान्यवर, जगभरातून आलेले सन्माननीय पाहुणे आणि योगविषयी आत्मीयता असणारे सर्व जण

“योग संशोधन आणि त्याचा उपयोगांबाबतची नवी क्षितिजे” या 21व्या आंतरराष्ट्रीय परिषदेत सहभागी होणं हा मोठा आनंददायक बहुमान आहे.

ह्या परिषदेचे आयोजन केल्याबद्दल मी विवेकानंद योग अनुसंधान संस्थानचा खूप आभारी आहे.

भारतीय आणि पाश्च्यात्य विचारांच्या सखोल वाचनाची सांगड हे विवेकानंदांची दृष्टी होती आणि त्यांनी आपल्या प्राचीन तत्वज्ञान आणि ज्ञान यातील विचार यादृष्टीतून मांडले. त्यांनी केवळ भारताच्या तत्वज्ञान विषयक पुनरुत्थानात महत्वाची भूमिका बजावली नाही, तर त्यांनी आपल्या कालातीत ज्ञान जगासमोर मांडले.

मानवी विविधतेच्या सौंदर्याविषयी त्यांनी सखोल जाणीव होती आणि ते आपल्या जगातल्या एकतेविषयी खूप तळमळीने बोलत असत.

योग विज्ञानासाठी हे विशेष खास वर्ष आहे.

21 जून रोजी 192 देशांमधील दहा लाखाहून अधिक लोक, पहिला आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा करण्यासाठी एकत्र आले.

जागतिक पातळीवर मिळणारा हा अतुलनीय पाठिंबा, योगाच्या वाढत्या आंतरराष्ट्रीय लोकप्रियतेचे लक्षण आहे.

आरोग्य आणि निरोगी राहण्यासाठीच्या जागतिक महत्वाकांक्षेचेही ते प्रतिक आहे.
मानव आणि निसर्ग तसंच लोक आणि देश यांच्यात शांतता आणि सद्भाव यामधे समतोल साधण्याच्या समान जागतिक इच्छेचे ते प्रतिबिंब आहे.

तसंच मोठे लक्ष्य साध्य करण्यासाठी विविध संस्कृतीतील लोक त्यांच्या आयुष्यातील नेहमीच्या सीमारेषा ओलांडून एकत्र येतात, हे पुन्हा एकदा दिसून आले आहे.
ही एकतेची भावना योगाच्या कालातीत विज्ञानाचे पुन्हा एकदा दर्शन घडवते.

आणि त्यामुळेच योगाच्या शक्तीवर असलेला विश्वास आणि मानवतेवर असणारी श्रद्घा, यामुळेच सप्टेंबर 2014 मधील संयुक्त राष्ट्रसंघाच्या आम सभेतल्या माझ्या उद्‌घाटनपर भाषणात मी ही संकल्पना सुचवली. जेव्हा आपल्या जगाच्या शाश्वत भविष्याचा विषय येतो, तेव्हा आरोग्यपूर्ण सवयी आणि आनंदी लोक, तसंच एक व्यक्ती, एक राष्ट्र आणि आंतरराष्ट्रीय समुदाय म्हणून आपल्या निवडीवर प्रभाव पाडणाऱ्‍या आपल्या जीवनशैलीत बदल हे महत्वपूर्ण ठरतात. या सर्वाचा आता जगात उदय होतो आहे. आणि विविध संस्कृती तसंच भूभाग यातील लोक आता आपल्या आयुष्याची व्याख्या निश्चित करण्यासाठी योगाकडे वळत आहेत – त्यांचा अंतरात्मा आणि बाह्य जग, तसंच त्यांचे अस्तित्व आणि त्यांचे पर्यावरण यांच्यात एकात्मता साधण्यासाठी. अ-संसर्गजन्य रोग हे जागतिक पातळीवरील मृत्यूंचे सर्वाधिक कारण आहेत, असे जागतिक आरोग्य संघटनेच्या जागतिक रोग विषयक अहवालात म्हटले आहे. 2008मधे विकसनशील देशांमधे या रोगांमुळे 80 टक्के मृत्यू झाले होते, 1990च्या मधे हे प्रमाण 40 टक्के होते.

2030पर्यंत अल्प-उत्पन्न असलेल्या देशांमधे अ-संसर्गजन्य रोगांमुळे होणारे मृत्यू, हे उच्च उत्पन्न देशांपेक्षा 8 टक्के जास्त असेल.

भारतात, हृदयविकार, कर्करोग, श्वसनविषयक जुनाट आजार, मधुमेह आणि इतर अ-संसर्गजन्य रोगांमुळे एकूण मृत्यूपैकी 60 टक्के मृत्यू होता. या रोगांमधे रुग्णालयात दाखल झालेल्यांपैकी 40 टक्के मृत्यू आणि नोंदणी झालेल्या बाह्यरुग्णांपैकी 35 टक्के मृत्यूंचा समावेश आहे. या मृत्यूंमुळे अनेक उत्पादनक्षम आयुष्य अर्ध्यावरच संपण्याची शोकांतिका निर्माण होते, तसंच कुटुंबांना या आकस्मिक नुकसानाशी सामना करावा लागतो, अर्थव्यवस्थेचाही प्रचंड तोटा होतो आणि आधीच खूप ताण असणाऱ्या आरोग्य यंत्रणेवर अतिरिक्त बोजा पडतो.

अ-संसर्गजन्य आजार आणि मानसिक आरोग्य समस्या यामुळे भारताचे 2030 पूर्वी 4.58 ट्रीलियन डॉलर्सचे नुकसान होईल, असा अंदाज काही सर्वेक्षणांमधे व्यक्त करण्यात आला आहे.

त्यामुळेच आपले शारिरीक आणि भौतिक आयुष्य सुधारतानाच, आपण आपल्या मनोवैज्ञानिक स्थितीकडेही लक्ष देण्याची गरज आहे.

या ठिकाणी योगाची भूमिका सर्वोच्च ठरते. जागतिक पातळीवर योगामुळे बदललेली आयुष्य आणि आशांची नवनिर्मिती याबाबतच्या अनेक मन हेलावणाऱ्या कथा आहेत.

“भारतीय योग… मानवतेच्या भावी आयुष्यासाठी एक चैतन्यपूर्ण घटक” ही श्री अरबिंदो यांची भविष्यवाणी खरी ठरत आहे.

यापूर्वी योगाकडे औषधी उपाय म्हणून पाहिले जात नसे. मात्र योग ही सर्वंकष जीवनपद्धती आहे. आणि यात शारिरीक, मानसिक, भावनात्मक, नैतिक आणि अध्यात्मिक एकात्मता आहे आणि त्यामुळे याचे प्रगल्भ आरोग्य फायदे आहेत.

आरोग्याची जी बदलती व्याख्या आहे, त्यात योग चपखलपणे अंतर्भूत होतो. आता आपण केवळ रोगांना प्रतिबंध घालण्यापुरतेच समाधान मानत नाही. आता लोकांना मन, शरीर आणि आत्म्याचे संतुलन असलेले आरोग्य हवे आहे.

सर्वंकष उपचार हवे आहेत, असे आता आपल्या कानावर अधिकाधिक येत आहे, आता आजारावर लगेच उपचार करण्याबरोबरच, लोकांना शारिरीक, मानसिक, सामाजिक आणि अध्यात्मिक दृष्ट्या परिपूर्ण व्यक्तिही बनायचे आहे.

पारंपरिक भारतीय पद्धती या, कुठल्याही व्यक्तीचा संपूर्ण अभ्यास करतात. या पद्धतीमधे आधी अर्थात मनाच्या पातळीवरील प्रश्न आणि व्याधी म्हणजेच शारिरीक पातळीवरील प्रश्न यांच्यातील दुवा शोधला जातो.

या पद्धती केवळ लक्षणांकडे पाहात नाहीत, तर अधिक खोलवर जाऊन तपास करतात. या पद्धतीमधे व्यक्तिंवर उपचार होतो. केवळ रोगावर नाही, त्यांचा फायदा दिसून येण्यासाठी कदाचित अधिक काळ लागू शकतो, पण त्यांचा परिणाम हा खोलवर आणि दिर्घकालीन असतो. आणि त्यात इतर कुठलाही दुष्परिणाम होत नाही.

आज सकाळी विज्ञान काँग्रेसमधे मी सांगितले, त्याप्रमाणे पारंपरिक ज्ञानाप्रमाणेच, विज्ञानही मानवी प्रयोग आणि निसर्गाच्या निरीक्षणाद्वारे उत्क्रांत झाले आहे. त्यामुळे केवळ विज्ञान हेच जगातील एकमेव निरीक्षण आणि प्रयोग यावर आधारीत ज्ञान आहे, असे आपण मानता कामा नये.

आणि हिप्पोक्रेटस ते पर्सिवल ते एडीसन यांच्यापर्यंत पाश्च्यात विचार पद्धतीने आरोग्याविषयी जी मते मांडली, ती भारतीय पद्धतीच्या तर्कशास्त्रापेक्षा मूलभूत रित्या निराळी नव्हती हे देखील आपण लक्षात घेतले पाहिजे.

त्यामुळेच अनादी काळापासून संचित झालेलं ज्ञान आणि अनुभव याबरोबर आपण आधुनिक विज्ञानाच्या पद्धतींची सत्यता पडताळून पाहणे, दर्जाबाबत खात्री पटवणे आणि फायदे समजून देणं यांचा वापर करायला हवा.

आणि म्हणूनच आम्ही औषधीविषयक “आयुष” पद्धतीचा अवलंब करणे, त्याचा स्वीकार करणे आणि त्याबाबत जागरुकता निर्माण करणे याबाबतच्या प्रयत्नांवर भर देत आहोत.

आणि असे करतांना, आम्ही लोकांमध्ये अधिक आरोग्य निर्माण करु, स्थानिक स्त्रोतांवर अधिक अवलंबून राहू आणि आरोग्य सेवांवरील खर्चात कपात करु शकू.

तसंच आम्ही आपल्या समाजावरील सामाजिक आणि आर्थिक खर्चही कमी करु शकू आणि पर्यावरण प्रेमी आरोग्य सेवा पदद्धतीला प्रोत्साहन देऊ शकू.

मी इथे एका पद्धतीचं दुसऱ्या पद्धतीवरील वर्चस्व सांगण्यासाठी आलेलो नाही. मानवता ही आपल्या वैविध्यामुळे श्रीमंत आहे, असे मी मानतो. विविध संस्कृती आणि देशांनी एकमेकांशी आपलं ज्ञान आणि बुद्धीमत्ता यांचे आदान-प्रदान केल्यामुळे ते अधिक संपन्न झाले आहेत. आणि एकमेकांपासून अधिकाधिक जाणून घेऊन आपण अधिक प्रगती करु शकू.

याच भावनेतून स्वामी विवेकानंदांनी पूर्व आणि पश्चिम यांच्यातील सर्वोत्तम एकत्र करावे, असे सुचवले होते.

आरोग्य सेवा क्षेत्रातही असेच घडले पाहिजे. आरोग्य सेवेसाठीचा माझा दृष्टीकोन हा एकात्मिक पद्धतीचा आहे, ज्यात विविध परंपरा आणि पद्धतीतील सर्वोत्तम पद्धतींचा अंगीकार आहे आणि या पद्धतींवर तो आधारीत आहे.

त्यामुळेच योग, आयुर्वेद, निसर्गोपचार, युनानी, सिद्ध, होमिओपथी आणि मॉडर्न मेडिसीन यातील मान्यवर डॉक्टर्स आणि संशोधक यांना एका व्यासपीठावर एकत्रित आणण्याच्या तुमच्या प्रयत्नांचे मी कौतुक करतो. मधुमेह, कर्करोग, मानसशास्त्रीय आरोग्य, रक्तदाब आणि हृदयरोग या महत्वाच्या अ-संसर्गजन्य रोगांवर तुम्ही केंद्रीत केलेले लक्ष हे प्रशंसनीय आहे. यामध्ये मला ज्या बद्दल अधिक आस्था वाटते, त्या मुद्यांचा समावेश आहे.

अत्‍याधुनिक औषधोपचार पद्धतीमुळे आरोग्यसेवांमधे आमूलाग्र बदल झाले आहेत – तपासणी, शोध आणि आजाराचे निदान. तंत्रज्ञानाच्या वापरामुळे आरोग्य सेवा उपलब्ध होण्यातले अडथळे कमी झाले आहेत आणि रोगाच्या पद्धतींविषयीचे आपले आकलन वाढले आहे. औषधे आणि लसी यामधे लागलेल्या शोधांमुळे अनेक रोगांवर मात करणे आणि ते काबूत ठेवणे शक्य झाले आहे.

पण या साऱ्याच्या मर्यादा आणि त्यांचे दुष्परिणाम या विषयी आपल्याला अधिक माहिती होऊ लागली आहे. आधुनिक औषधोपचार पद्धतींच्या वाढत्या खर्चाचा आपल्याला अनुभव येऊ लागला आहे, तेव्हा आपण केवळ भारतातच नव्हे, तर इतर देशांतही पारंपरिक पद्धतींकडे पुन्हा वळायला लागलोय.

या पद्धतींची लोकप्रियता वाढते आहे, योग हा आता जागतिक वारसा झाला आहे आणि संपूर्ण जग मोठ्या उत्साहाने पारंपरिक भारतीय औषधांचा स्वीकार करु लागले आहे. त्यामुळेच, मानवतेच्या सेवेसाठी मार्ग निश्चित करण्याबाबत आम्ही या परिषदेत आपल्याकडे पाहात आहोत.

आरोग्य व्यावसायिक, धोरणकर्ते, सरकारी संस्था आणि उद्योग क्षेत्र हे विविध औषधोपचार पद्धतींमधील दरी दूर करतील, अशी मला आशा वाटते.

तुम्ही आपल्या आरोग्य सेवा पद्धतीत योग आणि पारंपरिक भारतीय औषधं अधिक समाविष्ट कराल आणि भारतात तसंच उर्वरीत जगात निरोगीपणा हा जीवनाचा एक घटक बनवाल अशी मला आशा वाटते.

तुम्ही केवळ लोकांच्या आरोग्यदायी आणि आनंददायी जीवनात योगदान देणार नाही, तर हे योगदान अधिक समृद्ध आणि शांततामय जगासाठी आणि आपल्या पृथ्वीच्या अधिक शाश्वत भविष्यातही असेल. धन्यवाद.

J. Patankar/S.Tupe/M.Desai