Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केंद्रीय राज्यमंत्र्यांचा अध्यापनाला एक सर्जनशील कृती म्हणून अधोरेखित करणारा आणि  शिक्षकांना राष्ट्रउभारणीतील योगदानकर्ते म्हणून गौरवणारा एक लेख सामायिक केला  


पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केंद्रीय राज्यमंत्री जयंत चौधरी यांनी लिहिलेला एक लेख सामायिक केला आहे.

केंद्रीय राज्यमंत्र्यांनी आपल्या लेखात अध्यापन ही एक कला आणि सर्जनशील कृती असून  त्यासाठी मानवी संबंध, अध्यापनशास्त्र आणि विद्यार्थ्यांमधील क्षमता ओळखण्याची दृष्टी आवश्यक असते, असे पंतप्रधानांनी म्हटले आहे. राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020, ULLAS, विद्यांजली आणि इतर विविध उपक्रमांमुळे अध्यापन आणि अध्ययन प्रक्रिया अधिक बळकट होत आहे. तसेच, प्रत्येक शिक्षक राष्ट्रउभारणीतील योगदानकर्ता असल्याचे या लेखातून अधोरेखित होत आहे, असे पंतप्रधान म्हणाले.

पंतप्रधान कार्यालयाने X या समाज माध्यमावरील संदेशात म्हटले आहे :

“केंद्रीय राज्यमंत्री श्री @jayantrld लिहितात की, अध्यापन ही एक कला आणि सर्जनशील कृती आहे, ज्यासाठी मानवी संबंध, अध्यापनशास्त्र आणि विद्यार्थ्यांमधील क्षमता ओळखण्याची दृष्टी आवश्यक असते.

राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020, ULLAS, विद्यांजली आणि इतर विविध उपक्रम शिकवणे आणि शिकणे अधिक सक्षम करत आहेत, तसेच शिक्षकांना राष्ट्रउभारणीतील योगदानकर्ते म्हणून गौरवत असल्याचे या लेखात अधोरेखित केले आहे. “

***

सुषमा काणे/श्रद्धा मुखेडकर/परशुराम कोर

*** 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:PM India@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai   PM India /pibmumbai  PM Indiapibmumbai@gmail.com [ PM India 0KB ]   PM India/PIBMumbai   PM India /pibmumbai