Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सत्यवचन, प्रसन्न आणि हितकारक संवादाचे महत्त्व अधोरेखित करणारे संस्कृत सुभाषित सामायिक केले


नवी दिल्‍ली, 24 सप्‍टेंबर 2026

 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एक संस्कृत सुभाषित सामायिक केले असून या सुभाषितातून समाजात शांतता आणि सौहार्द्र वाढवण्यासाठी आपल्या बोलण्यात नेहमीच सत्य, मधुर आणि हितकारक शब्दांचा अवलंब करण्याचे महत्त्व तसेच वाणीमध्ये संयम आणि शिस्त पाळण्याची गरज अधोरेखित केली आहे.

पंतप्रधानांनी एक्स समाजमाध्यमावरील पोस्ट मध्ये लिहिले आहे:

“अनुद्वेगकरं वाक्यं सत्यं प्रियहितं च यत्।

स्वाध्यायाभ्यसनं चैव वाङ्मयं तप उच्यते॥” 

प्रत्येकाने नेहमीच बोलताना कोणी दुखावले जाणार नाही अशा सत्य, मधुर आणि हितकारक शब्दांचा अवलंब करावा. सद्ग्रंथांचें निरंतर चिंतन आणि स्वाध्यायामुळे आपली वाणी अधिक प्रभावी आणि अर्थपूर्ण होते आणि तिचा खरा उद्देश साध्य होतो. विचारपूर्वक केलेले संभाषण संपूर्ण समाजात शांतता, सौहार्द आणि सकारात्मकता पसरवते.

 

* * *

नेहा कुलकर्णी/भक्‍ती सोनटक्‍के/दर्शना राणे

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:PM India

@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai   PM India /pibmumbai  PM Indiapibmumbai@gmail.com [ PM India 0KB ]   PM India/PIBMumbai   PM India /pibmumbai