पीएम्इंडिया
नवी दिल्ली, 24 सप्टेंबर 2026
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उत्तर प्रदेशात ग्रेटर नोएडा येथे एका बसला आग लागून झालेल्या जीवितहानीबद्दल दुःख व्यक्त केले. आपल्या प्रियजनांना गमावलेल्या कुटुंबीयांप्रती त्यांनी शोकसंवेदना व्यक्त केल्या आणि जखमींना लवकरात लवकर वाटावे अशी प्रार्थना केली.
दुर्घटनेतील मृतांच्या कुटुंबीयांना पंतप्रधान राष्ट्रीय मदत निधीतून 2 लाख रुपयांची सानुग्रह मदत तसेच, जखमींना 50 हजार रुपयांची मदत दिली जाईल, असे पंतप्रधानांनी सांगितले.
पंतप्रधान कार्यालयाने एक्स समाजमाध्यमावरील पोस्ट मध्ये लिहिले आहे:
उत्तर प्रदेशात ग्रेटर नोएडा येथे एका बसला लागलेल्या आगीची घटना ऐकून व्यथित झालो. या दुर्घटनेत आपल्या प्रियजनांना गमावलेल्यांच्या दुःखात सहभागी आहे. जखमींच्या प्रकृतीत लवकरात लवकर सुधारणा होवो, अशी प्रार्थना करत आहे.
पंतप्रधान राष्ट्रीय आपत्ती निधीतून प्रत्येक मृताच्या कुटुंबीयांना 2 लाख रुपयांची सानुग्रह मदत दिली जाईल. जखमींना 50,000 रुपये दिले जातील: PM @narendramodi“
Distressed to hear about the loss of lives due to a fire tragedy on a bus in Greater Noida, Uttar Pradesh. Condolences to those who have lost their loved ones. Praying for the swift recovery of the injured.
An ex-gratia of Rs. 2 lakh from PMNRF would be given to the next of kin…
— PMO India (@PMOIndia) September 24, 2026
* * *
नेहा कुलकर्णी/भक्ती सोनटक्के/दर्शना राणे
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:![]()
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai@gmail.com [
0KB ]