Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुन्हा एकदा निवडणूक जिंकल्याबद्दल राष्ट्राध्यक्ष पुतीन यांनी केले अभिनंदन.


रशियन महासंघाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांनी आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी दूरध्वनीवरुन संपर्क साधला.
भारतात नुकत्याच पार पडलेल्या सार्वत्रिक निवडणुकीत पंतप्रधान मोदी यांना मिळालेल्या यशाबद्दल राष्ट्राध्यक्ष पुतीन यांनी त्यांचे मनःपूर्वक अभिनंदन केले आणि त्यांना पंतप्रधानपदाच्या या तिसऱ्या ऐतिहासिक कार्यकाळासाठी शुभेच्छा दिल्या.

यावेळी दोन्ही नेत्यांनी भारत-रशिया यांच्यात विविध क्षेत्रांमध्ये असलेली विशेष आणि विशेषाधिकारयुक्त व्यापक धोरणात्मक भागीदारी आणखी मजबूत करण्यासाठी यापुढेही कार्य करत राहण्यासंदर्भात सहमती व्यक्त केली.
वर्ष 2024 मध्ये रशियाच्या अध्यक्षतेत  सुरु असलेल्या ब्रिक्स परिषदेसाठी पंतप्रधान मोदी यांनी राष्ट्राध्यक्ष पुतीन यांना शुभेच्छा दिल्या.

दोन्ही नेत्यांनी एकमेकांच्या संपर्कात राहण्याबाबत सहमती दिली.

***

NM/SanjanaC/DY

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:PM India@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai   PM India /pibmumbai  PM Indiapibmumbai@gmail.com [ PM India 0KB ]   PM India/PIBMumbai   PM India /pibmumbai