Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्या डॉ. आंबेडकर आंतरराष्ट्रीय केंद्राचे उद्‌घाटन


पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्या नवी दिल्लीत 15 जनपथ येथे डॉ. आंबेडकर आंतरराष्ट्रीय केंद्राचे उद्‌घाटन होणार आहे. तसेच डॉ. आंबेडकर सामाजिक-आर्थिक परिवर्तन आंतरराष्ट्रीय केंद्राचेही ते उद्‌घाटन करतील.

“उद्या सकाळी 11 वाजता मी डॉ. आंबेडकर आंतरराष्ट्रीय केंद्राचे उद्‌घाटन करणार आहे. या केंद्राचा कोनशिला समारंभ माझ्याच हस्ते झाला होता. त्यामुळे या केंद्राचे उद्‌घाटन करण्याची संधीही मला लाभणे माझ्यासाठी विशेष बाब आहे. देशाच्या राजधानीच्या मध्यवर्ती भागात हे केंद्र उभारले जाणे म्हणजे डॉ. आंबेडकर यांना दिलेली यथोचित्त आदरांजली आहे.

डॉ. आंबेडकर आंतरराष्ट्रीय केंद्र हे बौध्द वास्तूकला आणि आजच्या काळातील वास्तूशास्त्राचा संगम घडवून बांधले आहे. यात चर्चा सत्रासाठी विशेष दालन याशिवाय तीन सभागृह आणि एक समृध्द वाचनालयही आहे.

त्याशिवाय, उद्या डॉ. आंबेडकर सामाजिक-आर्थिक परिवर्तन आंतरराष्ट्रीय केंद्रही राष्ट्राला समर्पित होईल. या इमारतीत संशोधन आणि युवकांमध्ये एखाद्या विषयावर मूलचिंतन करण्यासाठी आवश्यक सुविधा असून त्यातून चर्चा आणि संवादांना प्रोत्साहन मिळेल”, असे पंतप्रधानांनी म्हटले आहे.

B.Gokhale/R.Aghor/Anagha