पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या आणि परवा पूर्व उत्तरप्रदेशातील वाराणसी, आझमगढ आणि मिर्जापूरचा दौरा करणार आहेत.
आझमगढ येथे उद्या पंतप्रधानाच्या हस्ते 340 किलोमीटर लांबीच्या पूर्वांचल द्रुतगतीमार्गाचे भूमिपूजन होईल. या मार्गामुळे उत्तरप्रदेशातील अनेक महत्वाची आणि ऐतिहासिक शहरे एकमेकांशी जोडली जातील. यात बाराबंकी, अमेठी, सुलतानपूर, फैजाबाद, आंबेडकर नगर, आझमगढ, मऊ आणि गाझीपूर अशी शहरे राजधानी लखनऊला जोडली जातील. हा द्रुतगतीमार्ग पूर्ण झाल्यावर नोएडापासून ते गाझीपूरपर्यंत अनेक छोटी-मोठी गावे दिल्लीशी जोडली जातील.
वाराणसी येथे पंतप्रधानांच्या हस्ते 900 कोटी रुपयांच्या महत्वाच्या प्रकल्पांचे भूमीपूजन आणि लोकार्पण होईल. या प्रकल्पांमध्ये वाराणसी गॅस वितरण प्रकल्प आणि वाराणसी-बलीया ईएमयू ट्रेनचा समावेश आहे तर पंचकोशी परिक्रमामार्गासह स्मार्ट सिटी आणि नमामी गंगा अभियानाअंतर्गत, अनेक प्रकल्पांचे भूमीपूजन त्यांच्या हस्ते होईल. वाराणसी इथल्या आंतरराष्ट्रीय संमेलन केंद्राचे भूमीपूजनही पंतप्रधान करतील.
एका वेगळ्या समारंभात पंतप्रधानांच्या उपस्थितीत उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या हस्ते “मेरी काशी” या पुस्तकाचे प्रकाशनही होईल. 15 जुलैला पंतप्रधान मिरजापूर येथे जातील. तिथे बनसागर कालवा प्रकल्पाचे ते लोकार्पण करतील. या प्रकल्पामुळे मिर्झापूर आणि अलाहाबाद जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांना सिंचनाची सोय उपलब्ध होईल.
याच कार्यक्रमात पंतप्रधान मिर्झापूर वैद्यकीय महाविद्यालयाचे भूमीपूजन करतील आणि 108 जन औषधी केंद्राचे उद्घाटनही करतील. मिर्झापूर आणि वाराणसी दरम्यान वाहतूकीची सुविधा देणाऱ्या गंगा नदीवरील एका पुलाचेही पंतप्रधानांच्या हस्ते लोकार्पण होईल. चुनारच्या बालुघाट येथे हा पूल बांधण्यात आला आहे.
B.Gokhale/R.Aghor/P.Malandkar
PM @narendramodi will visit Varanasi, Azamgarh and Mirzapur districts of Uttar Pradesh on July 14th and 15th, 2018.
— PMO India (@PMOIndia) July 13, 2018
At Azamgarh, on July 14th, PM will lay Foundation Stone of the 340 km long Poorvanchal Expressway. This road will connect several towns of eastern UP, including Barabanki, Amethi, Sultanpur, Faizabad, Ambedkar Nagar, Azamgarh, Mau and Ghazipur – with the State Capital – Lucknow.
— PMO India (@PMOIndia) July 13, 2018
Once this Expressway is complete, Delhi will be connected via the Expressway, to several major towns and cities of the State of Uttar Pradesh, from Noida in the west, to Ghazipur in the east.
— PMO India (@PMOIndia) July 13, 2018
In Varanasi, the Prime Minister will dedicate and lay the foundation stone of important projects, cumulatively worth over Rs. 900 crore. Among the projects to be dedicated are the Varanasi City Gas Distribution Project, and the Varanasi-Ballia EMU train.
— PMO India (@PMOIndia) July 13, 2018
The foundation stone will be laid for the Panchkoshi Parikrama Marg, and several projects under the Smart City Mission and Namaami Gange. The Prime Minister will also lay the Foundation Stone for an International Convention Centre in Varanasi.
— PMO India (@PMOIndia) July 13, 2018
In Varanasi, the Chief Minister of Uttar Pradesh, Shri @myogiadityanath, will release a book titled “Meri Kashi,” in the presence of PM @narendramodi. The book will give glimpses of the extensive development work across Varanasi in the last four years.
— PMO India (@PMOIndia) July 13, 2018
On July 15th, PM will visit Mirzapur, where he will dedicate the Bansagar Canal Project to the Nation. This project will provide a big boost to irrigation in the region, and will be greatly beneficial for the farmers of Mirzapur and Allahabad districts of Uttar Pradesh.
— PMO India (@PMOIndia) July 13, 2018
PM will also lay the Foundation Stone of the Mirzapur Medical College. He will inaugurate 108 Jan Aushadhi Kendras in the State. He will also dedicate a bridge over the River Ganga at Balughat, Chunar, which will facilitate connectivity between Mirzapur and Varanasi.
— PMO India (@PMOIndia) July 13, 2018