Search

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना त्रिनिदाद आणि टोबॅगोच्या ‘ऑर्डर ऑफ द रिपब्लिक ऑफ त्रिनिदाद अँड टोबॅगो’ हा  सर्वोच्च राष्ट्रीय पुरस्कार प्रदान

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना त्रिनिदाद आणि टोबॅगोच्या ‘ऑर्डर ऑफ द रिपब्लिक ऑफ त्रिनिदाद अँड टोबॅगो’ हा  सर्वोच्च राष्ट्रीय पुरस्कार प्रदान


 

पोर्ट ऑफ स्पेन येथील राष्ट्रपती भवनात आयोजित एका विशेष समारंभात, त्रिनिदाद आणि टोबॅगो च्या राष्ट्रपति क्रिस्टीन कार्ला कांगालू ओआरटीटी यांनी, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना त्यांचे राजकीय कौशल्य, ग्लोबल साउथच्या प्राधान्यक्रमांना महत्वाचे स्थान देणे, आणि भारत आणि त्रिनिदाद आणि टोबॅगो यांच्यातील संबंध मजबूत करण्यासाठी दिलेल्या अपवादात्मक योगदानाबद्दल, त्रिनिदाद आणि टोबॅगोचा सर्वोच्च राष्ट्रीय पुरस्कार – “द ऑर्डर ऑफ द रिपब्लिक ऑफ त्रिनिदाद अँड टोबॅगो” प्रदान केला. पंतप्रधान मोदी, हा पुरस्कार मिळवणारे पहिले परदेशी नेते आहेत.

भारताच्या 1.4 अब्ज जनतेच्या वतीने हा पुरस्कार स्वीकारताना, पंतप्रधानांनी हा सन्मान दोन्ही देशांमधील मैत्रीच्या चिरस्थायी बंधांना समर्पित केला. 180 वर्षांपूर्वी या देशात आलेल्या भारतीयांनी रचलेला सामायिक इतिहास आणि सांस्कृतिक वारसा, या विशेष संबंधांचा पाया असल्याचे त्यांनी अधोरेखित केले. भारत आणि त्रिनिदाद अँड टोबॅगो यांच्यातील द्विपक्षीय भागीदारी अधिक दृढ करण्याच्या वचनबद्धतेचा त्यांनी पुनरुच्चार केला.

या कार्यक्रमाला त्रिनिदाद आणि टोबॅगो च्या पंतप्रधान कमला पर्साद-बिसेसर, त्यांच्या मंत्रिमंडळातील सदस्य, संसद सदस्य आणि इतर मान्यवर उपस्थित होते.

***

S.Kane/R.Agashe/P.Kor

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: PM India@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai   PM India /pibmumbai  PM Indiapibmumbai@gmail.com [ PM India 0KB ]