Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

पंतप्रधान बाबा बंदा सिंग बहादूरजी यांच्या 300 व्या शहीद दिन कार्यक्रमाला उपस्थित राहणार


पंतप्रधान नरेंद्र मोदी रविवारी नवी दिल्ली येथे बाबा बंदा सिंग बहादुरजी यांच्या ३०० व्या शहीद दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत.

पंतप्रधान यावेळी बाबा बंदा सिंग बहादुरजी यांच्यावरील पुस्तक आणि स्मरणिकेचे प्रकाशन करतील.

या कार्यक्रमाला पंजाबचे मुख्यमंत्री प्रकाश सिंग बादल उपस्थित राहणार आहेत. अलिकडेच बाबा बंदा सिंग बहादुरजी यांच्या स्मृतीप्रित्यर्थ प्रकाशित करण्यात आलेले नाणे पंतप्रधान आणि पंजाबच्या मुख्यमंत्र्यांना यावेळी भेट देण्यात येणार आहे.

यावेळी उपस्थित समुदायाला पंतप्रधान संबोधित करतील. तसेच या कार्यक्रमात बाबा बंदा सिंग बहादुरजी यांना काव्यमय आदरांजली देखील वाहिली जाणार आहे.

S.Kane/B.Gokhale