पीएम्इंडिया
गांधी जयंतीनिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या सकाळी राजघाट येथे राष्ट्रपिता महात्मा गांधी यांना आदरांजली वाहतील.
पंतप्रधान उद्या झारखंडला भेट देणार आहेत. खुंटी येथील जिल्हा न्यायालयासाठी 180 किलोवॅट क्षमतेच्या सौर संयंत्राचे ते उद्घाटन करतील. नंतर ते दुमका येथे प्रधानमंत्री मुद्रा योजनेंतर्गत एका भव्य कर्ज शिबिराचे उद्घाटन करतील.
संध्याकाळी “इंडिया टुडे” समूहाने नवी दिल्ली येथे आयोजित केलेल्या “सफाईगिरी पुरस्कार” सोहळयाला पंतप्रधान उपस्थित राहतील.
S.Kulkarni/S.Tupe